शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पुस्तकात आयुष्य बदलण्याची ताकद ; विद्यार्थ्यांनीच सांभाळली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:24 IST

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

ठळक मुद्दे किरण केंद्रे : कुपवाडला सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन

कुपवाड : पुस्तकाचे जग खूप सुंदर जग आहे. आयुष्य बदलण्याची ताकद पुस्तकात आहे. त्यामुळे पुस्तकाचा हातात धरलेला हात कधीच सोडू नका, असे प्रतिपादन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली शैक्षणिक संकुलात मंगळवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण केंद्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समडोळी हायस्कूलचा बालकवी गौतम पाटील होता, तर स्वागताध्यक्षपदी समृद्धी नागरगोजे होती.

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

दुसऱ्या सत्रात साहित्यिक पृथ्वीराज तौर यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी तौर म्हणाले की, लिहिण्यापेक्षा जास्त वाचले पाहिजे. कविता दु:खाचा, सहानुभूतीचा, अंत:करणाचा शब्द असतो. सुरवंटामधील फूलपाखरू ओळखणे गरजेचे बनले आहे. साहित्य संमेलने ही मुलांना अभिव्यक्तीचे पंख असल्याची जाणीव करून देतात, हे महत्त्वाचे आहे.

शेवटच्या सत्रात अस्मिता विश्वास चव्हाण हिच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनात जिल्ह्यातील ५७ कवींनी सहभाग घेतला. याप्रसंगी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या बालकथा संग्रहाचे व गौतम पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. ग्रंथदिंडी प्रदर्शन व साहित्यसुमनांनी हे संमेलन विद्यार्थीमय झाले होते.संमेलनाचे संयोजन जिल्हा परिषद, शिक्षण विभाग डायट व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांनी केले. दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, ताई गवळी, सुषमा डांगे, बाबासाहेब परीट, स्वाती शिंदे-पवार, रघुवीर अथणीकर, वनिता पाटील, प्राचार्य डॉ. रमेश होसकोटे, डॉ. अंजली रसाळ, मुस्ताक पटेल, तुकाराम गायकवाड, विश्वास आठवले, शशिकांत नागरगोजे, चित्रकार संतोष पाटील, राजाराम केंगार, अमोल माने, शशिकांत कांबळे, सुरेश पवार, गौतम कांबळे आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनंदा वाखारे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, तुकाराम राजे, मेहबूब जमादार, अभिजित पाटील, नामदेव भोसले, भीमराव धुळूबुळू , अश्विनी कुलकर्णी, वर्षा चौगुले, वंदना हुलबत्ते, मनीषा पाटील, वसंत पाटील, सुरेखा कांबळे, अनिल कुमार पाटील, महेश कुमार कोष्टी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा मानसतुम्ही लेखन करावे असे मला वाटते. कवितेत मन मुक्त होते. थोडक्या शब्दात खूप सांगतो तो साहित्यिक. कधी कधी डोळ्यातून पाणी येते आणि लेखनातून शब्द येतात. माणूस मरतो, पण साहित्य मरत नाही. म्हणूनच माझ्याबरोबर तुम्हालाही लिहिते करण्याचा मानस आहे, असे मत विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष गौतम पाटील याने व्यक्त केले.

प्रसंगकथन आणि लेखकांशी गप्पाप्रसंगकथन सत्रामध्ये दहा विद्यार्थी साहित्यकांनी अनुभव-प्रसंग कथन केले. यामध्ये कथा, महापूर, दुष्काळ यासारख्या प्रसंगांचे कथन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाटशिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विश्वजित माने हा विद्यार्थी होता. यानंतर पुस्तकातील लेखक हनुमंत चांदगुडे, संदीप नाझरे, मनोहर भोसले यांच्याशी मुलांनी मुक्त गप्पा मारल्या. त्यांचा लेखन प्रवास मुलांना प्रेरणादायी ठरला.

 

टॅग्स :Sangliसांगली