शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती-राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:19 IST

Flood Sangli mahavitaran : राज्यातील पूरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगितीची घोषणा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. थकबाकीच्या कारणास्तव तेथील वीजपुरवठाही तोडला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सांगलीत महापुरामध्ये महावितरणच्या झालेल्या हानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती-राऊतकर्ज काढून वीजपुरवठा -राऊत

सांगली : राज्यातील पूरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगितीची घोषणा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. थकबाकीच्या कारणास्तव तेथील वीजपुरवठाही तोडला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सांगलीत महापुरामध्ये महावितरणच्या झालेल्या हानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले की, महापूर काळात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले कामकेले, त्यामुळे कमीत कमी वेळात वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला. पुरामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे पूरस्थिती पुर्णत: निवळेपर्यंत वीजबिलांची वसुली केली जाणार नाही, किंबहुना बिलेही दिली जाणार नाहीत.

पूरग्रस्त भागात वीजपुरवठ्यासाठी नवा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. तेथे ट्रान्सफार्मरची उंची वाढविली जाईल. वीजबिले माफ करण्याचा अधिकार मंत्रीमंडळाला आहे, तेथे निर्णय झाल्यास कार्यवाही केली जाईल.राऊत यांनी सांगितले की, कोळशाच्या थकबाकीबद्दल कोळसा कंपन्यांची नोटीस महावितरणला आली आहे. कंपनी चालविण्यासाठीही पैसे लागतात. या स्थितीत वसुली आवश्यकच आहे. मीदेखील कोविड काळातील बिलापोटी एक लाख रुपये भरले आहेत. मागील सरकारने ५६ हजार कोटींची थकबाकी ठेवली नसती तर ही वेळ आली नसती. आम्ही सध्या कर्ज काढून वीजपुरवठा करत आहोत.

टॅग्स :floodपूरNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणSangliसांगली