शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबातील मुलगी राज्यात प्रथम, सांगलीतील बोरगावच्या पूजा वंजारीची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:55 IST

सध्या सहायक निबंधक म्हणून कार्यरत

युनूस शेखइस्लामपूर : काळ्या आईची सेवा करताना संघर्ष आणि अडचणींना तोंड देत कष्टाची पूजा मांडणाऱ्या बोरगाव (ता. वाळवा) येथील वंजारी कुटुंबातील पूजाने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमधून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. सध्या सहायक निबंधक म्हणून काम करणारी पूजा आता उपजिल्हाधिकारी म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारेल.‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ या संत तुकारामांच्या पंक्तींनाच आपल्या जीवनाचे सार बनवून शेतकरी कुटुंबाच्या शिरपेचात ज्ञान पांडित्याचा तुरा रोवण्याचा विक्रम पूजा अरुण वंजारी हिने करून दाखविला आहे.पूजाचे प्राथमिक शिक्षण प्रकाश पाटील विद्यामंदिरात व माध्यमिक शिक्षण मोहनराव पतंगराव पाटील विद्यालय असे बोरगावमध्येच झाले. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने २०१४ साली कंम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे वास्तव्य केले. वडील अरुण वंजारी शेती करतात, आई गृहिणी आहे.स्पर्धा परीक्षेच्या तयारीनंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात सहायक निबंधक सहकारी संस्था या पदावर बाजी मारली होती. यादरम्यान पूजाचे लग्नही झाले; मात्र तरीही तिने उच्च अधिकारी बनण्याचा ध्यास सोडला नाही. पुढे उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सर्वप्रथम येत आपली ही इच्छासुद्धा पूजाने आपल्या अफाट कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या बळावर पूर्ण केली. त्यांच्या या यशदायी वाटचालीत आई-वडिलांसह शेती करणारे चुलते भरत, बांधकाम व्यावसायिक बाबासाहेब आणि कुमार वंजारी यांचे प्रोत्साहन लाभले.

अधिकाऱ्यांचे कुटुंब..शिक्षणाचा ध्यास घेतला की, जीवनाचा कसा कायापालट होतो, हे बोरगावमधील वंजारी कुटुंबाने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे. पूजा वंजारी उपजिल्हाधिकारी बनेल. बहीण प्राजक्ता ही सध्या मुख्याधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहे. तर भाऊ रणजित भरत वंजारी हा पुणे येथेच जलसंपदा विभागात सहायक अभियंता म्हणून सेवेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा