शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:28 IST

सांगली शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला पुन्हा नोटीस बजाविण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीसनदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत

सांगली : शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला पुन्हा नोटीस बजाविण्यात आली आहे.कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शेरीनाला शुद्धीकरण योजना राबविण्यात आली. पण ही योजना अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. तब्बल ४० कोटीहून अधिक रुपये खर्च करूनही नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. योजनेचे पंप नादुरूस्त होतात. अनेकदा योजनाच सुरू केली जात नाही. त्यामुळे शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते.आठ दिवसांपूर्वी सरकारी घाटाजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटली होती. त्यामुळे सांडपाणी थेट नदीपात्रात जात होते. त्यात नदीत वाहते पाणी नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. याबाबत सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांच्यासह पथकाने सरकारी घाट परिसराला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पथकाने पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. हे नमुने जिल्हा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल घेतला. तसेच महापालिका नदीत सांडपाणी सोडून प्रदूषण करीत असल्याबद्दल नोटीस बजावली. हे सांडपाणी तात्काळ रोखण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे नोटिसीत बजावले आहे. सोबतच पुढील कारवाईसाठी कोल्हापूरच्या प्रादेशिक कार्यालयाकडेही अहवाल पाठविला आहे.उपप्रादेशिक अधिकारी औताडे म्हणाले, महापालिका सांडपाणी व्यवस्थापन न करता दररोज लाखो लिटर दूषित पाणी नदीत सोडते. यामुळे नदी प्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा नोटीस बजाविली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडेही अहवाल पाठविला असून त्यात महापालिकेवर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषणSangliसांगली