शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सांगली जिल्ह्यात रविवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:04 IST

सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीकरिता सांगली जिल्ह्यात रविवारी मतदान मद्य व ताडी विक्रीस बंदी आदेश जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणूका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 22 जून 2019 ते 24 जून 2019 रोजी मतमोजणी संपेपर्यंंत संबधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-2, एफएल-3, फॉर्म ई, ई-2, एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2, सीएल-3, टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेतया आदेशानुसार मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंदचा कालावधी व कंसात बंदचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे. निवडणूक लगतपूर्व व मतदानाचा दिवस शनिवार दिनांक 22 जून 2019 व रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी पूर्ण दिवस (सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदती संपणाऱ्या, नव्याने स्थापित व पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील), तसेच मतमोजणीचा/ मतमोजणीचे दिवस सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होईल त्या ठिकाणी) सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार विटा तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीकरिता असलेल्या ग्रामपंचायती व कंसात रिक्त जागा पुढीलप्रमाणे - डोंगरवाडी (2), सांबरवाडी (3), खरकटवाडी (2), रसुलवाडी (2), शिपूर (1), बामणोली (1), निलजीबामणी (1), कावजी खोतवाडी (1), मालगाव (1), तुंग (1), हरोली (1), कदमवाडी (1), जाधवनगर (2), देवनगर (1), भेडवडे (बु.) (1), धोंडेवाडी (2), ढवळेश्वर (1), रामनगर (2), जोंधळखींडी (1), विसापूर (1), वासुंबे (1), कोणबगी (1), गोटेवाडी (1), कोणीकुर्ण (1), बोर्गी बुद्रक (1), ढाणेवाडी (1), रेणुशेवाडी (2), तुपेवाडी (ये) (1), उपाळेवांगी (1), वाजेगाव (1), नेर्ली (1), पुणदीवाडी (1), पुणदी (वा) (1), तावदरवाडी (1), बुरंगवाडी (1), बेलेवाडी (2), चिखलवाडी (1), चिंचेवाडी (1), खराळे (2), भैरववाडी (1), शिवरवाडी (1), धसवाडी (2), कुसळेवाडी (1), ढोलेवाडी (1), कदमवाडी (2), खुदलापूर (1), वाकाईवाडी (2), चरण (1), पाचगणी (2), मोरेवाडी (2), पावलेवाडी (1), लादेवाडी (1), प. त. वारूण (1), अस्वलेवाडी (2), शिंदेवाडी (2), बिळाशी (2), मराठेवाडी (2), डोंगरवाडी (2), फार्णेवाडी बी (2), भरतवाडी (2), माणिकवाडी (1), फार्णेवाडी शि (1), नायकलवाडी (1), गाताडवाडी (1) व येलूर (1). 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSangliसांगली