शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

खत कंपन्यांच्या लिंकिंगला राजकर्ते, अधिकारी जबाबदार - रघुनाथदादा पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: March 25, 2025 18:17 IST

नको असलेल्या खताची शेतकऱ्यांना सक्ती

सांगली : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यात पुन्हा केंद्र, राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे रासायनिक खत विक्रेत्यांकडून खत लिंकिंग जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांची गरज नसलेल्या पीजीआर आणि मिश्र खताची सक्ती केली जात आहे. हे उद्योग शासनाने थांबवली नाही तर सरकार आणि खत कंपन्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

पाटील म्हणाले, युरिया घेण्यासाठी नको असलेली मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारून लिंकिंग केले जात आहे. यामध्ये सरकारच सहभागी झाले आहे, याला आमचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा एकीकडे सांगतात, रासायनिक खताचे लिंकिंग करू नका असे सांगत आहेत. तरीही खत कंपन्या आणि खत विक्रेत्यांकडून लिंकिंग चालूच आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत आहेत. खत कंपन्यांनाच त्यांचे पाठबळ दिसत आहे.

निवडणुकांमध्ये खत कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळत असल्यामुळे ते कंपन्यावर कारवाई करू शकत नाहीत. कृषी विभागाचे अधिकारीही त्यामुळेच गप्प आहेत. खत कंपन्यांच्या लिंकिंगविरोधात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेकडे फर्टिलायझर कंपनीच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत. तरीही नको असलेली मिश्र खते व इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. युरियावर सबसिडी मात्र सोबत दिली जाणारी खते महागडी आहेत.

शरद पवार यांच्याकडून दोनवेळा आमदारकीची ऑफरतत्कालीन एका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मला भेटण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आमदारकीचाही प्रस्ताव होता. पण, तो प्रस्ताव मी नाकारला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना शेतकरी संघटनेतून फोडून खासदार केले होते, असा गौप्यस्फोट रघुथनाथदादा पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.

तसेच मी खासदार, आमदार जनतेतून निवडणूक लढवूनच होणार आहे. पाच विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुका आतापर्यंत लढलो आहे. मतदारांनी मला स्वीकारले नाही. तरीही शेतकऱ्यांसाठी यापुढेही निवडणुका लढतच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

खत कंपन्यांकडून 'मॅनेज'साठी प्रयत्नखत लिंकिंगविरोधात आवाज उठवताच मलाही 'मॅनेज' करण्यासाठी रासायनिक खत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. माझ्या नातेवाइकांकडेही कंपनीचे प्रतिनिधी गेले होते. तरीही मी त्यांना मॅनेज झालो नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी खत कंपन्यांच्या विरोधात मी आवाज उठविणार आहे, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र