शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

राजकारणीच आमच्यापेक्षा उत्तम अभिनेते - प्रशांत दामले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:49 IST

गुळाचा गणपती होणार नाही

सांगली : नाट्यचळवळ वाढवायची असेल आणि त्यासाठी पाठबळ मिळण्यासाठी राजकीय व्यक्तींनी आवर्जून नाटक बघणे आवश्यक आहे. नाट्यगृहातील किमान समस्या बघून त्या सोडविल्या तरी कलाकारांना हुरूप मिळत असतो. कलाकारांना केवळ तीन तासांसाठी नाटक करावे लागते. मात्र, तोच तो चेहरा ठेवून २४ तास अभिनय करणारे राजकीय नेतेच उत्तम अभिनेते असतात यासाठी त्यांना सलामच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी रविवारी सांगलीत केले.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरव पदक स्विकारल्यानंतर आयाेजित मुलाखतीवेळी ते बोलत होते. ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विचारलेल्या खुमासदार प्रश्नांना तितक्याच दिलखुलासपणे दामले यांनी उत्तरे देत सांगलीकर रसिकांची मने जिंकली.दामले म्हणाले की, कोणतीही कलात्मक चळवळीला राजकीय पाठबळ आवश्यक असते. यासाठीच राजकीय नेत्यांनी नाटके बघावीत. या क्षेत्रातील अडचणी त्याशिवाय त्यांच्या ध्यानात येणार नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे नाट्यगृहात येऊन नाटक बघत असत.

नाट्यचळवळीच्या प्रश्नावर दामले म्हणाले की, देशात केवळ महाराष्ट्र आणि बंगाल या ठिकाणीच नाट्य चळवळीला समृद्ध पावणेदोनशे वर्षांचा इतिहास आहे. ही परंपरा जतन करायला हवी. अलीकडे नाटकांना प्रेक्षक मिळत नाहीत, अशी चर्चा होत असलीतरी यात तथ्य वाटत नाही. कारण जर दर्जेदार आणि प्रेक्षकांची मानसिकता ओळखून नाटक लिहिले आणि सादर केले तर त्याला प्रतिसाद मिळतो हे सिद्ध झाले आहे. राज्यात ४८ अशी ठिकाणे आहेत ज्याठिकाणी नाटकांचे प्रयोग होऊ शकतात आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही मिळतो. अशा ठिकाणी दर्जेदार नाट्यगृहे उभारली अथवा आहेत त्या नाट्यगृहातील समस्या सोडविल्या तरीही नाटकांना प्रतिसाद वाढणार आहे.रंगभूमीवर इतकी वर्षे काम करताना सर्वात आनंदाचा हा क्षण असून, नाट्यपंढरी सांगलीतील या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते दामले यांना भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, डॉ. भास्कर ताम्हनकर, विलास गुप्ते, मेधा केळकर, जगदीश कराळे, विवेक देशपांडे, बलदेव गवळी, आनंदराव पाटील, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते.

नाट्यगृह उभारताना ‘जाणत्या’ लोकांना विचारापालकमंत्री सुरेश खाडे यांनी मनोगतात सांगलीत लवकरच २५ कोटी रुपयांचे सुसज्ज नाट्यगृह उभारले जाणार असल्याचे सांगितले. यावर दामले यांनी नाट्यगृह उभारताना आर्किटेक्टपेक्षा कलाकारांचा सल्ला जरूर घ्या. त्या स्टेजवर जे कलाकार काम करणार आहेत त्यांनाच त्यातील समजते. यावेळी खाडे यांनी विष्णूदास भावे नाट्यमंदिरासह मिरज येथीलही नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येईल, असे सांगितले.

सांगलीत ‘बंगाली’चा ‘मद्रासी’ झालो

१९८३ मध्ये सांगलीत झालेल्या ‘टूरटूर’ नाटकाच्या प्रयोगावेळचा किस्सा प्रशांत दामले यांनी सांगितला. या नाटकात बंगाली व्यक्तीचा मी रोल करत होतो. प्रयोगावेळी मद्रासी व्यक्तीचा काम करणारा कलाकार अचानक आला नाही. त्यामुळे सुधीर जोशी, विजय केंकरे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मद्रासीची भूमिका मला करायला लावली. मेकअपमनने पूर्ण काळे केले होते. मात्र, त्यावेळच्या उकाड्यामुळे माझा तो रंग जाऊन गोरागोमटा झालो होतो.

गुळाचा गणपती होणार नाहीनाट्यसंमेलनाचा अध्यक्ष व्हायला आवडेल का प्रश्नावर प्रशांत दामले म्हणाले की, चळवळीतील जुन्या-जाणत्यांना या पदावर संधी मिळावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा उपयोग होतो. मलाही अध्यक्ष व्हायला आवडेल, मात्र गुळाचा गणपती होण्यापेक्षा त्या पदाचा कलाकारांसाठी उपयोग करून घेता आला पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीPrashant Damleप्रशांत दामले