शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे :डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:16 IST

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा लाभ वंचित मतदारांनी घेऊन, मतदारयादीमध्ये आपले नाव नोंदवावे. त्यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे :डॉ. अभिजीत चौधरीमतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती

सांगली : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा लाभ वंचित मतदारांनी घेऊन, मतदारयादीमध्ये आपले नाव नोंदवावे. त्यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजितराजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीसउपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह, शेखर इनामदार, ॲड. अजित सूर्यवंशी, आबासाहेबजाधव, संदीप कांबळे, कुमार सावंत, संजय कुलकर्णी, यशवंत पाटील, दीपक माने आदि राजकीय पक्षप्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 20,21, 27 व 28 जुलै 2019 या सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदान केंद्रस्तरीयअधिकारी जिल्ह्यातील सर्व 2 हजार 474 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जस्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालये व 282 सांगलीविधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे तसेच,जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे समाविष्ट होण्यासाठी नमुना - 6 चे अर्ज भरुन द्यावेत. प्रत्येक राजकीय पक्षाने मतदान केंद्र निहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ताची नियुक्ती करावी. त्यासाठीचे नमुना अर्ज मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीयपक्षांनी सतर्क राहावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 1 जानेवारी 2019 या अर्हतादिनांकावर आधारित 15 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार सांगली जिल्ह्यातील 8विधानसभा मतदारसंघात एकूण २३ लाख ६४ हजार ७०० मतदारांची संख्या आहे. यामध्ये १२ लाख १७हजार ९५ पुरूष, ११ लाख ४७ हजार ५२९ स्त्री आणि ७६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये प्रत्येक मतदाराने आपले नाव असल्याची खात्री करावी. ज्यांची नावे मतदारयादीतून विविध कारणास्तव वगळण्यात आली आहेत, त्यांनी मतदार यादीत नावाचा समावेश होण्यासाठी अर्ज करावा. तसेच, अशी नाव वगळणी झालेल्या मतदारांची यादी बुथस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन ती तपासून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणारे सर्व नागरिक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्‍ये अर्ज करु शकतील.ज्या मतदारांची मतदार यादीत छायाचित्रे नाहीत तसेच ज्‍यांची कृष्‍णधवल छायाचित्रे आहेत अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे या कालावधीत रंगीत छायाचित्र (फोटो) देऊन सहकार्य करावे. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे समाविष्ट होण्यासाठी नमुना - 6 चे अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अस्तित्‍वातील मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेपनोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधीलमतदारांच्‍या तपशीलात दुरुस्‍ती करण्यासाठी नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. एकाच मतदारसंघात एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास त्याकरिता नमुना 8 अ मध्ये अर्ज करता येईल, असे त्यांनीसांगितले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली