शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बामणोलीत भरदिवसा पोलिसाचा बंगला फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:52 IST

बामणोली (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या मनोहर रामजी बामणे (वय ५०) यांचा बंद बंगला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन हजार पाचशे रुपये रोख, असा २ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

ठळक मुद्देबामणोलीत भरदिवसा पोलिसाचा बंगला फोडलादागिन्यांसह २ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या मनोहर रामजी बामणे (वय ५०) यांचा बंद बंगला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन हजार पाचशे रुपये रोख, असा २ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.बामणोलीतील मनोहर बामणे यांचा मुलगा गणेश हा सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस असून त्याची पत्नी नाशिक येथे पोलीस सेवेत कार्यरत आहे. बामणे कुटुंबीय गुरुवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दोन बेडरूममधील लाकडी कपाटे फोडून सोन्याचे दोन गंठण, चेन, दोन अंगठ्या, कर्णफुले, दोन मंगळसूत्रे असे अकरा तोळे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे दागिने व रोख दोन हजार पाचशे रुपये असा एकूण अंदाजे दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस पथकाने कसून तपास केला. परंतु श्वानपथक परिसरातच घुटमळल्याने चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.

दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली