शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सांगलीत मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:35 IST

सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम तातडीने मिळावी व दुधाचे दर घसरत चालल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याने दूध दरवाढ तातडीने करावी, यासह

सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम तातडीने मिळावी व दुधाचे दर घसरत चालल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याने दूध दरवाढ तातडीने करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रवेशद्वारातून आत जाण्यावरून आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दूध ओतण्यात आले.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला तरी, अद्याप एफआरपीची रक्कम कारखानदारांनी दिलेली नाही. देशात साखरेचे चांगले उत्पादन होऊनही केंद्र सरकारने पाकिस्तानकडून साखर आयात केली. आता वाढीव पॅकेज जाहीर केल्याशिवाय येत्या गळीत हंगामात एकही साखर कारखाना चालू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

सध्या दुधाचे प्रतिलिटर १८ रूपये दर असल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. ३.५ फॅटला २७ रूपये दर जाहीर करूनही तो दर दिला जात नाही. यासाठी एकाही दूध संघावर सरकारने कारवाई केली नाही. खा. राजू शेट्टी संसदेत दोन विधेयक मांडणार आहेत. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना सादर करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, महावीर पाटील, संदीप राजोबा, वैभव चौगुले, जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, जयकुमार कोले, अशोक खाडे, बी. आर. पाटील, संजय खोलकुंबे, पोपट मोरे उपस्थित होते.आंदोलनस्थळी तणावाचे : वातावरणमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी प्रवेशद्वारातून आत जाऊन आंदोलन करण्याचा आग्रह धरला. त्यास पोलिसांनी विरोध केल्याने आंदोलनस्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. त्याचवेळी काही तरूण सांगली-मिरज मार्गावर जाऊन बसल्याने वाहतूकही काही वेळासाठी ठप्प झाली होती. याचवेळी शासनाचा निषेध म्हणून प्रवेशद्वारासमोरच दूध ओतण्यात आले. अखेर पोलिसांनी सहकार्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना