शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेगावमध्ये हॉटेल चालकाला पोलिसांची दमदाटी

By admin | Updated: February 8, 2015 00:56 IST

दोन सिलिंडर नेले : फुकट जेवण करून दहा हजारांची मागणी केल्याची तक्रार

जत : तालुक्यातील शेगाव येथे हॉटेलमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वापरत असल्याची दमदाटी करीत चौघा पोलिसांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करून त्याचे पैसेही दिले नाहीत. शिवाय हॉटेलमधील दोन गॅस सिलिंडर गाडीत घालून नेल्याची तक्रार हॉटेलचालक बिरा हणमंत सोलनकर यांनी केली आहे. हा प्रकार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. यासंदर्भात प्रत्यक्ष जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटून सोलनकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यन करणार आहे, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते, दिलीप वायकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे व जीपचालक हरी खंडागळे हे चारजण गाडीतून (क्र. एमएच १०/एन ६६६) २६ जानेवारी रोजी दुपारी शेगाव येथील सोलनकर यांच्या हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वांनी मद्यपान व जेवण केले. त्यानंतर त्यांनी गॅस सिलिंडरचा परवाना आहे का?, अशी विचारणा केली. हॉटेल मालक परवाना असल्याचे सांगून तो आणण्यासाठी आतमध्ये गेले. यादरम्यान हॉटेलमधील दोन गॅस सिलिंडर गाडीत घालून चौघेही तेथून निघून गेले.
गॅस सिलिंडर घेऊन सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर बाबूराव बागल या मध्यस्थामार्फत त्यांनी सोलनकर यांना दूरध्वनी केला आणि प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. बागल यांच्यामार्फतच पाच हजार रुपयांवर तडजोड केली; मात्र सोलनकर यांनी गॅस सिलिंडर परवाना असल्याने पैसे देण्यास नकार देत ‘त्यांना नियमानुसार कारवाई करू दे’ असे सांगून दूरध्वनी बंद केला.
पोलीस अधिकारी व कर्मचारी हॉटेलमध्ये येऊन मोफत जेवण व मद्यपान करून परवाना असलेले गॅस सिलिंडर गाडीत ठेवून निघून गेले. यावेळी त्याठिकाणी दत्तात्रय माने, संभाजी सोलनकर, तानाजी यमगर, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी जत विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे करत आहेत. (वार्ताहर)