शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा ‘कॉल’; पोलिसांची धावपळ

By घनशाम नवाथे | Updated: January 4, 2025 21:17 IST

मालगावचा तळीराम अखेर ताब्यात

घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : तारीख : ४ जानेवारी..स्थळ : डायल ११२ कंट्रोल रूम...वेळ : सकाळी ११.३०... फोन खणखणला...‘सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे, पोलिस मदत हवी आहे’ असे समोरून सांगितल्यानंतर फोन कट...मग पोलिसांची धावपळ सुरू...पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाची तपासणी...अखेर खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मालगाव (ता. मिरज) येथील यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. तवटे मळा) या तळीरामास ताब्यात घेतले.

शनिवारी सकाळी ११.३० वाजता डायल ११२ वर कॉल आल्यानंतर फोन करणाऱ्याने ‘सांगली पोलिस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला, पोलिस मदत हवी आहे’ अशी अर्धवट माहिती देत फोन कट केला. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल ११२ वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ आदेश दिले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाला पाठवून तपासणी करण्यात आली. परंतू तेथे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू केला. सहायक निरीक्षक नितीन सावंत व पथकाने हा कॉल मालगाव (ता. मिरज) येथून आल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर कॉल करणाऱ्या यमनाप्पा माडर याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे कबुल केले.

दरम्यान कोणताही खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.

यापूर्वी पोलिसांना खोटा कॉल

यमनाप्पा माडर याने यापूर्वीही २०२३ मध्ये असाच कॉल करून गोंधळ उडवून दिला होता. त्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माडर याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Sangliसांगली