संख : संख (ता. जत) येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी उमदी पोलिसांनी नाकाबंदी केली. सकाळी ११ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुुकाने बंद केली. विनामास्क फिरणाऱ्यांवर १२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
शासनाच्या आदेशानुसार व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी संख येथे उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी सकाळी ११ नंतर कडक निर्बंध लागू केले. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. २५ वाहनचालकांवर ५०० रुपयांप्रमाणे १२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आले.
यावेळी उपनिरीक्षक नामदेव दांडगे, हवालदार सुनील गडदे, इंंद्रजित गोदे आदी उपस्थित होते.