शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नाट्य परिषदेतर्फे ‘पीएनजी’ महाकरंडक एकांकिका स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:53 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे,

ठळक मुद्देआंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा२0 ते २२ सप्टेंबरपर्यंत आयोजन

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएनचीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.ताम्हणकर म्हणाले की, या स्पर्धेची व्यापकता वाढली आहे. संपूर्ण राज्यभरातून आता महाविद्यालयीन स्तरवरील संघांना आम्ही निमंत्रीत करीत आहोत. एकांकिका बसविण्यासाठी महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना आर्थिक कसरत करावी लागते. त्यामुळे एकांकिका सादर करणाऱ्या प्रत्येक संघाला २ हजार रुपये निर्मिती खर्च दिला जाणार आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास १५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व फिरता करंडक दिला जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकास १२ हजार तर तिसऱ्या क्रमांकास १0 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

त्याचबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत अशा वैयक्तिक स्वरुपाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास अनुक्रमे दीड हजार, एक हजार व पाचशे रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. सर्व सहभागी कलावंतांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी सांगली, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, बेळगाव याठिकाणच्या पीएनजीच्या शोरुम्समध्ये येत्या १३ सप्टेंबरअखेर प्रवेशिका जमा कराव्यात. सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहातही प्रवेशिका जमा करून घेतल्या जाणार आहेत.

सहभागी महाविद्यालयाने यासाठी सर्व पूर्ततेसह प्रवेशिका सादर कराव्यात. गेल्या काही वर्षात या महाकरंडक स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. यंदाही राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्रीनिवास जरंडीकर, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली