शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लावणीला पाच हजारांवर सखींची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:14 AM

इस्लामपूर : ढोलकीच्या तालावर ताल धरायला लावणाºया लावण्यवतींचे नृत्य... ठसकेबाज लावण्यांची बरसात... लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या बहारदार नृत्यावर सखींनीही ठेका धरला. अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित लावणी महोत्सवाला पाच हजार सखी सदस्यांनी मोठी दाद दिली. अनेक महिलांनी आपल्यातील नृत्याची कला या सखी मंचच्या व्यासपीठावर ...

इस्लामपूर : ढोलकीच्या तालावर ताल धरायला लावणाºया लावण्यवतींचे नृत्य... ठसकेबाज लावण्यांची बरसात... लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या बहारदार नृत्यावर सखींनीही ठेका धरला. अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित लावणी महोत्सवाला पाच हजार सखी सदस्यांनी मोठी दाद दिली. अनेक महिलांनी आपल्यातील नृत्याची कला या सखी मंचच्या व्यासपीठावर सादर केली. यावेळी महिलांनी आणलेल्या शिट्ट्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता.येथील औद्योगिक वसाहतीमधील भव्य अशा वातानुकूलित सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉलमध्ये लावणी महोत्सव झाला. ‘लोकमत’चे संस्थापक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, पालिकेचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक शहाजी पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, पोरवाल ज्वेलर्सचे प्रीतम पोरवाल, अजिंक्य बझारचे अनिल पाटील, पांडुरंग पाटील, रघुनंदन एजन्सीचे अमरसिंह पाटील, आशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांचे स्वागत शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, इस्लामपूर विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला.‘या रावजी, बसा भाऊजी’ या लावणीने सुरेखा पुणेकर यांची एन्ट्री झाली आणि सखी सदस्यांनी टाळ्या व शिट्ट्यांचा एकच जल्लोष केला. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या लावणीलाही सखींनी विशेष दाद दिली.कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेल्या सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची, ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा... इष्काचा गुलकंद खिलवा’ या बहारदार लावणीने एन्ट्री झाली. ‘पारवाळ घुमतंय कसं’, ‘मी मेनका उर्वशी’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘सोडा सोडा राया हा नादखुळा नादखुळा’ अशा एकसे एक लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम अधिकच बहरत गेला. ‘अधीर मन झाले, लैला मै लैला’ या गाण्यांवर सखींनी ठेका धरला.महोत्सवात सादर होत असलेल्या प्रत्येक लावणीगणिक महिलांचाही उत्साह द्विगुणित होत होता. त्यांनी मारलेल्या शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. सखींनी गर्दी करून लावण्यवतींच्या नृत्याबरोबरच स्वत:ही ठेका धरला होता. हा उत्साह शेवटच्या गाण्यापर्यंत कायम होता.‘जरा खाजवा की बुगडी शोधायला डोकं’, ‘शांताबाई... शांताबाई’, ‘बाई मी लाडाची गं लाडाची, कैरी पाडाची’ या गाण्यांनाही विशेष दाद मिळाली. ‘कारभारी दमानं...’ या लावणीच्या सादरीकरणासाठी सुरेखा पुणेकर यांची थेट महिला प्रेक्षकांतून एन्ट्री झाली आणि सर्वांनी ठेका धरला. मृणाल कुलकर्णी यांनी शेवटी सादर केलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यावर तर सगळ्यांनी एकसारखा ताल धरत तुफान दाद दिली. कलाकारांनीही या रसिकतेला तशीच दाद दिली.ग्रामीण भागातील प्रतिसाद आनंददायी- करण दर्डाकार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी ग्रामीण भागातही सखी मंचला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. त्यांनी ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सखी मंचचा उपक्रम कौतुकास्पद : शेट्टीराजू शेट्टी म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी चवळवळीला ‘लोकमत’ने नेहमीच साथ दिली आहे. सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एकत्र करुन त्यांच्यासाठीचा ‘लोकमत’चा उपक्रम तितकाच महत्त्वाचा आहे. इस्लामपूरसारख्या निमशहरी भागातही जवळपास पाच हजारांवर महिलांना हक्काचं व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांचे अभिनंदन.