शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सांगलीत पूरग्रस्त भागावर सीसीटीव्हीचा वॉच महापालिकेकडून नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 3:25 PM

सांगली : गतवर्षी सांगली , मिरज शहराला महा पूराचा मोठा दणका बसला होता. त्यामुळे यंदा महापालिकेने संभाव्य महा पूराच्या ...

ठळक मुद्देसांगलीत पूरग्रस्त भागावर सीसीटीव्हीचा वॉच महापालिकेकडून नियोजन दोन नवीन यांत्रिक बोटीची खरेदी, १ हजार लाईफ जॅकेट घेणार, आपत्ती यंत्रणा सज्ज

सांगली : गतवर्षी सांगली, मिरज शहराला महापूराचा मोठा दणका बसला होता. त्यामुळे यंदा महापालिकेने संभाव्य महापूराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून यंत्रणा सज्ज केली आहे.

शहरातील पूरग्रस्त भागात सीसीटीव्ही बसविले जात असून नव्याने दोन यांत्रिकी बोटी, हजार लाईफ जॅकेटसह विविध साहित्यही महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहे. संभाव्य महापूरच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे.

गतवर्षी महापूराने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे काढले होते. त्यामुळे महापालिकेने आतापासून यंत्रणा सज्जतेवर भर दिला आहे. गतवर्षी नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी तरुण मंडळे, बोट क्लबनी मदतीचा हात दिला होता. या मंडळ, बोट क्लबशी महापालिकेने संपर्क साधला आहे.

सध्या महापालिकेकडे ७ यांत्रिकी बोटी आहे. त्यात आता नव्याने दोन यांत्रिकी बोटीची भर पडणार आहे. त्याशिवाय ५० लाईट जॅकेट उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी १ हजार लाईफ जॅकेटची खरेदी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातर्गंत विविध साहित्यांचीही खरेदी केली जात आहे.

महापालिकेच्यावतीने गावभाग, कृष्णा नदी काठ, दत्तनगर, शामरावनगर, कोल्हापूर रोड या पूरपट्ट्यात १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरूवात केली आहे. हे कॅमेरे महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे पुराचे पाण्यावर लक्ष ठेवता येणार आहे.

आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांचा जीव कसा वाचवावा, याबाबत जनजागृती सुरू आहे. सात ठिकाणी बोट हाऊसगतवर्षी पुरावेळी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटी वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा आयुक्त कापडणीस यांनी पुरग्रस्त भागात सात ठिकाणी बोट हाऊस उभे करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाला दिले आहेत. या सात ठिकाणी प्रत्येक एक बोट व प्रशिक्षित कर्मचारी असेल. त्यामुळे पुराचे पाणी वाढल्यास संबंधित परिसरात तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचता येणार आहे. तसे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाfloodपूरSangliसांगली