शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  : खासगी तत्वावर प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:26 IST

Muncipal Corporation Sangli- सांगली शहरातील आमराई उद्यानात खासगी तत्वावर गार्डन ट्रेन सुरू करण्यास शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या गार्डन ट्रेनसह उद्यानात एक कोटीची सुशोभिकरणाची कामे हाती घेतली असून वर्षभरात उद्यानाचे रुप पालटेल, असे नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देसांगलीत गार्डन ट्रेनला स्थायीची मंजुरी  वर्षा निंबाळकर यांचा पाठपुरावा : खासगी तत्वावर प्रयोग

सांगली : शहरातील आमराई उद्यानात खासगी तत्वावर गार्डन ट्रेन सुरू करण्यास शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या गार्डन ट्रेनसह उद्यानात एक कोटीची सुशोभिकरणाची कामे हाती घेतली असून वर्षभरात उद्यानाचे रुप पालटेल, असे नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी सांगितले.

आमराई उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी निंबाळकर यांनी पुढाकार घेतला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. सध्या उद्यानातील मुख्य रस्ता डांबरी केला आहे. कारंजे व इतर सुविधासाठी ६० लाखाची निविदाही काढण्यात आली आहे. त्यासोबतच करमणुकीसाठी गार्डन ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर होता. त्याला सर्वच सदस्यांनी सभेत मंजुरी दिली.

आमराईच्या सौंदर्यात भर पडेल, असा सर्वांनी विश्वास व्यक्त केला. खासगी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ट्रेनसाठी रुळ, प्लॅटफार्म, उड्डाणपुल तयार करण्याची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे. २९ वर्षासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून प्रतिव्यक्ती २५ रुपये तिकीटदर असेल. प्रशासनाने अटी व शर्तीच्या आधीन राहून गार्डन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.झाडांना धक्का नाहीवर्ष निंबाळकर म्हणाल्या, उद्यानात २५०ते ३०० मीटर वर्तुळाकार जागेत रेल्वे ट्रॅक उभारला जाणार आहे. प्लॅटफॉर्म, उड्डाणपूलही तयार करण्यात येणार आहे. आमराईतील वृक्षांना धक्का न लावता हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली