शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पलूस येथील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:00 IST

Vishwajeet Kadam Highway Sangli : कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

ठळक मुद्देकराड-तासगाव राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाला गती मिळणारराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती

मुंबई  : कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्गावरील पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.सदर बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्र.266 अंतर्गत पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यानचे रखडलेले महामार्गाचे काम उपलब्ध जागेत सात मिटर रुंदीने काँक्रीटीकरण करून तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले असून यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान महामार्गाचे रखडलेच्या कामासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक डॉ. विश्चजीत कदम यांच्या पुढाकारातून घेण्यात आली.

या बैठकीत व्हिडीओ काँन्फरन्सीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, राष्ट्रीय महामार्ग सचिव, श्री. विनय देशपांडे, तसेच अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी भाग घेतला. पलूस तहसील कार्यालय येथून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, जे.के.बापू जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे,  वैभवराव पुदाले आदी उपस्थित होते.विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्यातील १६ कि.मी अंतराचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या मार्गावर सतत लहान-मोठे अपघात होत आहेत. अपघातात काही जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे. अशी भूमिका राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी मांडली. त्यानंतर महामार्गाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते यांनी रस्त्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती सांगितली.यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सध्या शेतकऱ्यांची याचीका उच्च न्यायालयात आहे, त्यावर न्यायालय जो निर्णय देईल, त्याला अधिन राहुन त्याप्रमाणे भविष्यात काम करता येईल. मात्र, तोपर्यंत थांबून चालणार नाही. सध्या उपलब्ध जागेत सात मिटर रुंदीने तात्काळ रखडलेले काम सुरू करावे. तुपारी फाटा आणि येळावी फाटा या दोन्ही बाजूकडून काम सुरू करावे. म्हणजे काम लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. यासाठी शेतकरी, नागरिक यांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक श्री. महेंद्र आप्पा लाड , श्री. जे. के.बापू जाधव आदींनी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी भूमिका मांडली.यावेळी महामार्गाचे मुंबई, पुणे, कोल्हापूर येथून सर्व वरिष्ठ अधिकारी , तसेच पलूस तहसील कार्यालय येथून सुहास पुदाले, गिरिश गोंदिल, मिलिंद डाके, शरद सांडगे, रतन पाटील, विक्रम पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकSangliसांगली