शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सांगली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर पुन्हा फुली, प्रवासी संघटनांकडून प्रशासनाबद्दल नाराजी

By अविनाश कोळी | Updated: May 14, 2024 16:10 IST

क्रॉसिंगचा जीवघेणा खेळ, फसवणुकीचा अध्याय सुरूच 

सांगली : विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी सांगलीचेरेल्वे स्थानक अधोगतीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल बनविण्याचे आश्वासन देऊनही मध्य रेल्वेने पुन्हा सांगलीच्या पादचारी पुलाची अर्धी दाढी करण्यातच धन्यता मानली आहे. प्लॅटफाॅर्म क्र. ४ व ५ साठी तांत्रिक कारण देत पादचारी पुलाच्या कामावर फुली मारण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले प्रवासी प्लॅटफॉर्म ४ व ५ अद्याप प्रवासी गाड्यांसाठी वापरण्यात येत नाही. पुणे-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होऊनही सांगली स्टेशनवर क्राॅसिंगची कसरत करावी लागते, तसेच सांगली स्थानकावर पादचारी पूल नसल्याचे कारण देऊन नवीन गाड्या सुरू करण्यास रेड सिग्नल देण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा खेळही दुसऱ्या बाजूला सुरू आहे.सांगली स्थानकावर प्लॅटफार्म एक, दोन व तीनवरील पादचारी पुलाचे काम मार्चमध्ये चालू झाले; पण चार व पाचवर पादचारी पुलाचे काम तांत्रिक कारण देत बंद ठेवले आहे. नवे प्लॅटफाॅर्म उभे राहून पाच महिने उलटले तरी अद्याप त्याठिकाणी पादचारी पूल उभारला नाही. प्लॅटफॉर्म पाचवर पादचारी पूल नसल्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात, ऋषिकेश, हरिद्वार, पटना, प्रयागराज, पुणे, मुंबई येथून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना विनाकारण क्रॉसिंगची कसरत करत प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोनवर आणावे लागत आहे.

क्रॉसिंगचा जीवघेणा खेळपादचारी पूल नसल्यामुळे सांगलीत प्रवासी तसेच माल धक्क्यावर काम करणाऱ्या कामगार व हमालांच्या जिवाला मोठा धोका आहे. त्यांना रोज रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे