शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेंगदाणा निघाला परदेशी, भाजी चमचमीत करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 18:04 IST

सांगली : दिवाळीपर्यंत स्थिर असणारा शेंगदाणा आता सरासरी १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. परदेशी निर्यात वाढल्याने दर तेजीत असल्याचे ...

सांगली : दिवाळीपर्यंत स्थिर असणारा शेंगदाणा आता सरासरी १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. परदेशी निर्यात वाढल्याने दर तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीकडे पाठ फिरविल्यानेही शेंगदाणा दुर्मिळ होऊ लागला आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतीक्षेत्र ऊस, द्राक्षे आणि अन्य नगदी पिकांखाली आले आहे. देशी शेंगा तर पाहायलादेखील मिळेनात, अशी स्थिती आहे. फुले प्रगती वाणाच्या भुईमुगाचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे.शेंगदाण्याचे दरमहिना -     घुंगरू  -  स्पॅनिश  -  गुजराती-जाडासप्टेंबर -     १२५       १३०          १२०ऑक्टोबर    १३०       १२०          ११५नोव्हेंबर       १२०      ११५          १०५जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर भुईमूग पेरणी- जिल्ह्यात सुमारे २९ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ, जत, खानापूर, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात क्षेत्र मोठे आहे.- शेंगतेलाची मागणी व किमतीत वाढ होऊनही भुईमुगाचे क्षेत्र मात्र दरवर्षी घटत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे. फुले प्रगती वाण आघाडीवर असून देशी भुईमूग औषधालाही दिसेनासा झाला आहे.निर्यात वाढल्याने भावही वाढले

- शेंगदाण्याची परदेशी निर्यात वाढल्याने देशांतर्गत भावही वाढले आहेत. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू व कर्नाटकातून निर्यातीला माल जावू लागल्याने स्थानिक बाजारपेठेत दरवाढ झाली. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे.- अविनाश खोबरे, व्यापारी, सांगली

घरगुती वापरासाठी जास्त तेल असणाऱ्या घुंगरू वाणाला मागणी जास्त आहे. दिवाळीनंतर मागणी घटल्याने दर स्थिर आहेत. गुजरातचा माल खारे शेंगदाणे तयार करण्यासाठी वापरला जातो. त्याचे दर किंचित वाढत आहेत. - गजानन मरगुद्री, व्यापारी, सांगली

शेंगदाण्याशिवाय स्वयंपाक कसा?

शेंगदाण्याचा ५० ते ६० रुपयांचा भाव १२० रुपयांवर गेला तरी पर्याय नाही. शेंगदाण्यांशिवाय स्वयंपाक कसा करायचा? काही भाज्यांमध्ये शेंगदाण्याऐवजी डाळी वापरण्याची कल्पकता दाखवतो. इतर सर्वच मालाचे भाव वाढले असताना शेंगदाणा तरी कसा मागे राहणार? - स्नेहा मोरे, गृहिणी, सांगली.

शेंगदाणे स्वस्त असतात तेव्हा एकदम जास्त प्रमाणात घेऊन ठेवतो. त्यामुळे वर्षभरात दर वाढले तरी झळ बसत नाही. गावाकडूनही हंगामात भुईमूग आणतो. आठवड्याला खरेदी करणे परवडत नाही. स्वयंपाकाशिवाय मुलांना पोषक खाद्य म्हणूनही द्यावे लागतात. - दीपा जतकर, गृहिणी, सांगली

टॅग्स :Sangliसांगली