शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पुसेसावळी दंगलीतील मृताच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये द्या, सांगलीत एमआयएमची निदर्शने

By संतोष भिसे | Updated: October 10, 2023 15:33 IST

तत्पूर्वी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली.

सांगली : पुसेसावळी (जि. सातार) येथे दंगलीदरम्यान मरण पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी एमआयएमने केली. दंगलीमागील सूत्रधारावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या अटकेमध्ये पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले.

तत्पूर्वी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. डॉ. कांबळे म्हणाले, दंगल ओसरल्यानंतर झालेल्या तपासामधून खरे सूत्रधार स्पष्ट झाले आहेत. मरण पावलेला मुस्लिम तरुण किंवा पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांचा दंगलीत सहभाग नव्हता हेदेखील स्पष्ट झाले आहे. काही मुस्लिमद्वेष्ट्यांनी कट रचून हल्लाबोल केला व तरुणाची हत्या केली.

पोलिसांनी गुन्हे नोंदविले, पण संबंधितांना अटक केली नाही.  त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी सूत्रधारांना त्वरित अटक करावी, शासनाने मृत तरुणाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी आहे. यामुळे पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांना दिलासा मिळेल. आंदोलनात निलेश वायदंडे, शादाब बारगीर, रियाज ढाले, असिफ इनामदार, अस्लम मुल्ला, ओम पाटील, मुदस्सर मुजावर, एजाज आगलावणे आदी सहभागी झाले.

टॅग्स :Sangliसांगली