शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शंभरफुटी रस्त्यावर दारूड्या पतीचा खून, डोक्यात घातली पहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 14:49 IST

दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (वय ३८) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसांगलीत शंभरफुटी रस्त्यावर दारूड्या पतीचा खून डोक्यात घातली पहार, पत्नीला अटक

सांगली : दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (वय ३८) यांना पोलिसांनी अटक केली आहे.चंद्रकांत साळुंखे याचे गणपती पेठेत चहा विक्रीचे दुकान आहे. त्याला दारूचे व्यसन होते. उभयतांना एक मुलगा आहे. दारू पिऊन कौटुंबिक कारणावरून चंद्रकांत हा पत्नीशी वारंवार भांडण करीत असे. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने या पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत होता.

रविवारी सकाळीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन, चंद्रकांत साळुंखे याला ताकीद देऊन सोडून दिले. रात्री उशिरा साळुंखे हा मद्यधुंद अवस्थेत घरी गेला. त्याने पत्नीशी पुन्हा भांडण सुरू केले. त्यामुळे रागाच्या भरात माधवी यांनी घरातील लोखंडी पहार घेऊन चंद्रकांत याच्या डोक्यात तीनवेळा प्रहार केला.

वर्मी घाव बसल्याने मोठा रक्तस्राव होऊन चंद्रकांत खाली पडला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून जमलेल्या शेजारच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पत्नी माधवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी