तालुक्यातील १० ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू असून यामध्ये पात्रेवाडीसाठी ७ जागांवर १० जणांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये ५ जागा बिनविरोध झाल्या. २ जागांसाठी निवडणूक लागली आहे, पण ही निवडणूक प्रक्रिया केवळ तांत्रिक ठरली आहे. कारण गेले दोन पंचवार्षिक येथे मागासवर्गीय प्रवर्गासाठी या दोन जागांचे आरक्षण असून त्यासाठी निवडणूक घेतली जाते. पण या गावात या प्रवर्गाचे नागरिक राहत नसल्याने तिथे उमेदवार न मिळाल्याने जागा रिक्त राहतात. यंदाही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
उर्वरित ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांची संख्या : विठ्ठलापूर ९ जागांसाठी १२ उमेदवार, घरनिकी ११ साठी १३ उमेदवार, धावडवाडी ७ साठी १३ उमेदवार, पात्रेवाडी सातपैकी ५ बिनविरोध, तर २ जागांसाठी २ उमेदवार, देशमुखवाडी ७ जागांसाठी १३ उमेदवार, शेटफळे १३ जागांसाठी ३७ उमेदवार, बोंबेवाडी ७ जागांसाठी ८ उमेदवार, तळेवाडी ८ जागांसाठी १९ उमेदवार, लेंगरेवाउी ९ जागांसाठी १८ उमेदवार, माडगुळे ९ जागांसाठी २० उमेदवार.