शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्या अस्थींचे औदुंबरला विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:17 IST

अंकलखोप : माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन मंगळवारी औदुंबर

अंकलखोप : माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन मंगळवारी औदुंबर (ता. पलूस) येथे करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते, नागरिकांनी त्यांच्या अस्थींचे दर्शन घेतले.

सकाळी सातपासून कार्यकर्त्यांनी कृष्णातीरी गर्दी केली होती. सर्वांनी अस्थिकलशासमोर फुले अर्पण केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना हुंदका आवरता आला नाही. अनेकांचे डोळे पाणावले होते. गोरगरीब सामान्यांचा पोशिंदा गेल्याची भावना व्यक्त केली जात होती.

मंगळवारी डॉ. कदम यांच्या अस्थिकलशाचे औदुंबर येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या अनेक निवडणुकांचा प्रारंभ औदुंबर येथील देवस्थानाच्या साक्षीने होत असे. त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित असत. तशीच गर्दी त्यांच्या अस्थिकलश विसर्जनाला दिसून आली. मात्र, यावेळचा प्रसंग वेदना देणारा असल्याने प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते.

दर्शनानंतर अस्थिकलश दत्त मंदरासमोरील कृष्णातीरावर नेण्यात आला. त्याठिकाणी औदुंबर येथील ब्रम्हवृंदांकडून मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर बोटीतून कृष्णा नदीच्या मध्यभागी नेऊन अस्थी डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते विसर्जित करण्यात आल्या.कार्यकर्त्यांनी डॉ. विश्वजित कदम, जितेश कदम, सागर कदम, महेंद्रआप्पा लाड, राजेंद्र जगताप व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक, पुण्याचे नगरसेवक अभय छाजेड, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच मच्छिंद्र गडदे उपस्थित होते.गावोगावी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणारकडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश बुधवार दि. १४ ते १९ मार्च या कालावधित कडेगाव पलूस तालुक्यातील सर्व गावांमध्ये तसेच सांगली शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे. गावा-गावांतील कार्यकर्ते व चाहत्यांना दर्शन घेता यावे यासाठी अस्थिकलश ठेवला जाणार आहे. शनिवार, दि. १७ रोजी कुंभारगाव येथे दुपारी ४ वाजता, कुंडल ४, सावंतपूर, सांडगेवाडी ६.४५, बांबवडे ७.२५, मोराळे ८.२०, आंधळी ९. रविवार, दि. १८ रोजी तुपारी सकाळी ८, दह्यारी ८.४५, घोगाव ९.१५, दुधोंडी ९.५०, पुणदी १०.५०, पुणदीवाडी ११.४०, नागराळे १२.१५, रामानंदनगर ४, बुर्ली ५, आमणापूर ५.४५, विठ्ठलवाडी ६.२५, संतगाव ७, सूर्यगाव ७.३०, नागठाणे ८.१०. सोमवार दि. १९ रोजी धनगाव सकाळी ८, बुरुंगवाडी ८.४५, हजारवाडी ९.२०, भिलवडी स्टेशन ९.४५, खंडोबाचीवाडी १०.३५, माळवाडी ११.१०, वसगडे १२, खटाव १२.४०, ब्रम्हनाळ १.१०, सुखवाडी ४.१५, चोपडेवाडी ४.४५, भिलवडी ५.२०, अंकलखोप ६.२५, पलूस ७.४५.

टॅग्स :SangliसांगलीPatangrao Kadamपतंगराव कदम