शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

सांगली : पतंगराव कदम यांना परदेशातही आदरांजली , ओमान स्थित भारतीय नागरिक शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:48 IST

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देपतंगराव कदम यांना परदेशातही आदरांजली ओमान स्थित भारतीय नागरिक शोकाकुल लाखोंचा पोशिंदा हरपल्याचे  दुःख 

प्रताप महाडिक कडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील, सरला पाटील, रुक्मिणी पाटील, मधुरा पाटील, हर्षवर्धन पाटील (चिंचणी -तालुका कडेगाव) यांच्यासह ओमान स्थित वीरेंद्र जाधव (फलटण), दीपक कुंभार व करीम मुलाणी (निमसोड, तालुका कडेगाव ), अनिल जोशी, सोनाली जीशी, प्रीती जोशी  (भिलवडी, तालुका पलूस ), डॉ. श्रीमंत अडसूळ (बार्शी जिल्हा सोलापूर ), प्रशांत सोनावणे (लातूर ), सदाशिव मांगले, समृद्धी मांगले (गडहिंग्लज), डॉ. संजय निकम (कऱ्हाड) आदी भारतीय नागरिकानी  दिवंगत नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली.

यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल तिव्र दुःख व्यक्त केले व  त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित भारतीय नागरिकांनी गरिबांचा कैवारी व लाखोंचा पोशिंदा हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त करताना डॉ. पांडुरंग पाटील म्हणाले, मी १२ वीला असताना माझ्या वडिलांचे निधन झाले.

अनंत अडचणींना सामोरे जात मी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजला बीएस्सी झालो. पुढे शिकण्याची माझी परिस्थिती नव्हती. यावेळी डॉ. पतंगराव कदम साहेबानी मला पुण्याच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एमएस्सीला प्रवेश दिला. पुढे मी पीएचडी केली. यानंतर मी लिबिया देशात प्रोफेसर म्हणून नोकरीसाठी गेलो. लिबियात अस्थिरतेमुळे फेब्रुवारी २०११ मध्ये माझ्यावर ओढवलेल्या संकटातूनसुद्धा मला साहेबांनीच बाहेर काढले व सुखरूप भारतात आणले होते.

आता मी ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात तेथील मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या तांत्रिक महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अशाप्रकारे संकटकाळी धावून येणारा आमचा आधारवड निखळला, असे  प्रोफेसर डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अनेक भारतीय नागरिकांनी भारती विद्यापीठात शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी परदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले व डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल दुःख व्यक्त केले.

साहेबांच्या फोनमुळे लिबियातून मायदेशात सुखरूप : डॉ. पांडुरंग पाटील सन २०११ मध्ये मी लिबिया देशातील अलमर्ग विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी त्या देशातील प्रजेने तेथील हुकूमशहा कर्नल गद्दाफी यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यावेळी तेथे अस्थिरता निर्माण झाली. अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयायांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकार करत होते, परंतु लिबियातील भारतीय दूतावासालाही माझ्याशी संपर्क साधणे कठीण झाले होते. या कठीण प्रसंगात मीही अडकलो होतो.

यावेळी चिंचणी येथील माझे मित्र डॉ. भरत महाडिक यांनी  डॉ. पतंगराव कदम यांना सर्व हकिकत सांगितली. यावर डॉ. पतंगराव कदम यांनी भारताचे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांना थेट फोन केला. साहेबांच्या या एका फोनची दखल घेऊन भारत सरकारने लिबियातील भारतीय दूतावासामार्फत मला २७ फेब्रुवारी २०११ रोजी सुरक्षीत मायदेशात आणले. परंतु या देवमाणसाने या ऋणातून मला उतराई होण्याची संधीही मला दिली नाही असे डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली