शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

पतंगराव कदम बोलले खरे, पण..!

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

भानगडीमुळे महापालिका बदनाम : वर्चस्वाच्या लढाईचा पहिला अंक सुरू; कारभार सुधारण्याचे आव्हान

शीतल पाटील- सांगली --सांगली महापालिका आणि भानगडी यांचे नाते काही औरच आहे. भानगडीशिवाय महापालिकेत चांगले-वाईट घडू शकत नाही. जनतेच्या हितासाठी, विकासासाठी भानगडी केल्या, तर गोष्ट वेगळी. पण ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ अशीच मानसिकता येथील कारभाऱ्यांची राहिल्याने, दररोज बोंबाबोंब सुरू आहे. आता काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी महापालिकेतील भानगडबाजीवर बोट ठेवले आहे. वर्षभरात पालिकेचा कारभार सुधारू, अशी ग्वाहीही दिली आहे. पण त्यांना कितपत यश मिळते, याविषयी सध्या तरी साशंकता आहे. कधी बीओटीची भानगड, तर कधी खुल्या भूखंडाची! एक ना अनेक भानगडी महापालिकेत दररोज सुरू असतात. मग सत्ताधारी कोण आहे, हे त्यासाठी महत्त्वाचे नसते. सत्ता कुणाचीही असली तरी, आजअखेर पालिकेतील भागनडीला लगाम घालता आलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. महापालिका निवडणुकीनंतर पहिले वर्षभर विरोधकांची उपस्थिती जाणवते. नंतर मात्र सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे शोधावे लागते. सेटलमेंटचे राजकारण हा तर नेहमीचाच खेळ बनला आहे. या साऱ्यातून जनतेच्या हाती काय पडले, याचा विचार पालिकेच्या पटलावर कधीच झाला नाही. एकीकडे नागरिक चांगले रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत सुविधांसाठी टाहो फोडत असतात, तर दुसरीकडे महापालिकेत निवडून आलेले लोकसेवक मात्र स्वत:ची तुंबडी भरण्यातच मग्न असतात. त्यातही साऱ्यांनाच वाटा मिळतो असे नाही. पालिकेचा गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांच्या हाती सारी सूत्रे असतात. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानीत असे दोन- चार कारभारी आहेत. तेच सारे निर्णय घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांवर लादतात. यातूनच आता सत्ताधारी व विरोधकांत खदखद सुरू झाली आहे. कारभारी नगरसेवकांविरोधात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवक एकवटू लागले आहेत. यात केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर राष्ट्रवादीचेही नगरसेवक आहेत. कारभाऱ्यांनी केवळ आपल्या प्रभागाचा, स्वत:चा विकास करायचा आणि दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नगरसेवकांना वाऱ्यावर सोडायचे, या प्रकारातून आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. त्याला पालिकेतील अर्थकारणाची किनार असली तरी, प्रभागाच्या विकासाचा मुद्दाही नजरेआड करून चालणार नाही. म्हणून कुपवाड विभागीय कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी नगरसेवकांच्या खऱ्या दुखण्यावरच बोट ठेवले आहे. महापौर विवेक कांबळे, गटनेते किशोर जामदार, सुरेश आवटी यांना कानपिचक्या देताना प्रशासनालाही शेलक्या भाषेत टोचले आहे. मोठमोठे नगरसेवक निधी पळवितात आणि बारक्या नगरसेवकांवर अन्याय होतो, असे जाहीरपणे सांगून कदम यांनी, पालिकेत काय चाललंय याचा एक नमुनाच सांगितला. महापालिकेतील बोंबाबोंब थांबवा, असे सांगताना आयुक्तांच्या कारभाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यातून प्रशासन व कारभारी नगरसेवक काय धडा घेतात, हे भविष्यात कळेलच. खरी कसोटी : महापौर निवडीवेळीसध्या महापालिकेत वेगवेगळ्या कारभाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गटा-तटाचे राजकारण सुरू आहे. नगरसेवकांची विभागणी झाली आहे. त्यात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवकांचा एक मोठा गट एकत्र आला आहे. या साऱ्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकसंधपणे ठेवण्याचे आव्हान आ. पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व विश्वजित कदम यांच्यासमोर आहे. फेब्रुवारी महिन्यात महापौर, उपमहापौर निवडी होत आहेत. या निवडीवेळी नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्यासाठी कदम पिता-पुत्रानी आतापासूनच महापालिकेत लक्ष घालून नगरसेवकांना दुरूस्त करण्याची गरज आहे. भानगडी रोखणार तरी कोण? महापालिकेतील भानगडींना केवळ विशिष्ट पदाधिकारी, अधिकारीच कारणीभूत आहेत असे नाही. भानगडीच्या विषयात अर्थपूर्ण तडजोड यशस्वी ठरली, तर सारेच एकमेकाच्या सुरात सूर मिसळतात. तिथे कोणी विरोधक नसतो, कोणी सत्ताधारी नसतो. त्यामुळे नेत्यांनी कितीही घोषणा केल्या तरी, भानगडी रोखणे तसे मुश्किलीचे आहे.