शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून रात्री प्रवाशांनी अचानक मारल्या उड्या ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:08 IST

मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ

ठळक मुद्देपरळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलला

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ उडाला.मिरज स्थानकातून दररोज रात्री मिरज-परळी व कोल्हापूर-सांगली पॅसेंजर सुटते. दररोज परळी पॅसेंजर प्लॅटफॉर्म तीनवरून व सांगली पॅसेंजर प्लॅटफॉर्म एकवरून रवाना होते.

दोन्ही पॅसेंजरच्या वेळेत दहा ते पंधरा मिनिटांचाच फरक आहे. बुधवारी रात्री प्लॅटफॉर्म एकवर येणारी कोल्हापूर-सांगली पॅसेंजर ऐनवेळी प्लॅटफॉर्म चारवर घेण्यात आली. या बदलाबाबत ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा झाली नसल्याने व परळी पॅसेंजर आली नसल्याने परळीला जाणारे प्लॅटफॉर्म तीनवरील प्रवासी सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पण ही पॅसेंजर सांगलीच्या दिशेने जाऊ लागल्याने आतील प्रवाशांत गोंधळ उडाला.

काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्या. यामुळे साखळी ओढून पॅसेंजर थांबविण्यात आली. पॅसेंजरमधून उड्या मारलेल्या काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. रेल्वेच्या या कारभाराबाबत प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी