शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शिवशाही चालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी त्रस्त, रात्री प्रवाशांची ससेहोलपट

By संतोष भिसे | Updated: September 26, 2022 19:02 IST

शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड

सांगली : खासगी शिवशाही गाड्यांवरील चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासातील तसेच शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे.एसटी महामंडळाकडे खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये वाहत नियुक्त नसतो. त्यामुळे चालक मनमानीपणे सेवा देत असल्याने उत्पन्न बरेच घटले होते. थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही गाडी न थांबविणे, रिकामीच पळविणे असे प्रकार सुरु होते. याला आळा घालण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी आपले वाहक नियुक्त केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. गाड्या भरुन धावू लागल्या. पण त्यानंतरही चालकांची दादागिरी थांबली नाही.पुण्या-मुंबईहून आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सामान्यत: शहरातील छोट्या थांब्यांवर प्रवासी उतरण्यासाठी थांबतात. सांगलीत शासकीय रुग्णालय, पुष्पराज चौक, बाजार समिती, विश्रामबाग, विजयनगर, वॉन्लेसवाडी, मिरजेत वंटमुरे कॉर्नर, रेल्वेस्थानक असे थांबे घेत जातात. एसटीच्या सर्व बसेस व शिवशाही गाड्या तेथे थांबतात. खासगी शिवशाहीचे चालक मात्र थांबत नाहीत. सांगली बसस्थानकानंतर थेट विश्रामबाग आणि मिरज बसस्थानकांत थांबतात. त्यामुळे अध्येमध्ये उतरु इच्छिणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात.विशेषत: रात्री उशिरा शहरात आलेल्या प्रवाशांना रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागतात. या छोट्या थांब्यांवर थांबण्यासाठी वाहकाने सूचना करुनही दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चालकांना सक्त सूचना देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

खासगी लक्झरी थांबतात, मग शिवशाही का नाही?खासगी प्रवासी कंपन्यांच्या गाड्या सर्व थांब्यांवर थांबतात, एकेक प्रवासी घेतात किंवा उतरवतात. मग शिवशाही का थांबत नाही? असा प्रवाशांचा प्रश्न आहे. एसटीच्या उत्पन्नाशी काहीही देणेघेणे नसलेल्या खासगी चालकांमुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीShivshahiशिवशाहीpassengerप्रवासी