अंकलगी सरपंचपदी परमेश्वर बिरादार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:58+5:302021-02-26T04:37:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संख : अंकलगी (ता. जत) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परमेश्वर मलकाप्‍पा बिरादार तर उपसरपंचपदी लगमव्वा महिलारे डोळ्ळी ...

Parmeshwar Biradar as Ankalgi Sarpanch | अंकलगी सरपंचपदी परमेश्वर बिरादार

अंकलगी सरपंचपदी परमेश्वर बिरादार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : अंकलगी (ता. जत) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परमेश्वर मलकाप्‍पा बिरादार तर उपसरपंचपदी लगमव्वा महिलारे डोळ्ळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मोमीन यांनी काम पाहिले.

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन ग्रामविकास पॅनेलने ७ जागा जिंकून बहुमत सिद्ध केले. सत्ताधारी पॅनेलला ४ जागा मिळाल्या. सरपंचपदी परमेश्वर बिरादार व उपसरपंचपदी लगमव्वा डोळ्ळी यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड झाली.

नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी पंचायत समिती सभापती आर. के. पाटील, माजी शिक्षण सभापती तमाणगौडा रवी पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, प्रकाश जमदाडे, विजयकुमार चिपलकट्टी, रवी मैत्री, मल्लिकार्जुन मैत्री, शिवानंद हाके, विठ्ठल निकम, बुद्रुक मुल्ला, बी. बी. कोहळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विश्वनाथ आरळी, महातेश माळी, चंद्रकांत नरुटे, ईरप्‍पा कोळी, श्रीशैल कोळी, महादेव कांबळे, इलाही मुल्ला, फिरोज मुजावर, सतीश माळी, रवी पाटील, आप्पासाहेब पाटील, जगदेव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Parmeshwar Biradar as Ankalgi Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.