शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पेपर फुटीप्रकरणी आरोग्य सेविकाबडतर्फ

By admin | Updated: November 27, 2015 00:41 IST

एक निलंबित : फेरपरीक्षा घेण्याचा स्थायी समितीचा ठराव; दोघींवर कॉपीचा गुन्हा

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर शेटफळे आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) हिला बडतर्फ करण्यात आले, तर तिला मदत करणारी नियमित आरोग्य सेविका शकिरा उमराणीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्यात येत असून आणखी काही नावे उजेडात येण्याची चिन्हे आहेत. आरोग्य सेवक (महिला) या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार बुधवारी दुपारी परीक्षेदरम्यान उघडकीस आला़ याप्रकरणी दोन आरोग्य सेविकांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन आरोग्य सेविकांवर तातडीने कारवाई केली.पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी बुधवारपासून लेखी परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा होती़ आरोग्य सेवक (महिला) पदाच्या ३८ जागांसाठी ९१५ उमेदवार होते़ दुपारी दोन वाजता आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी लेखी परीक्षा होती़ ग़ रा़ पुरोहित कन्या प्रशालेतील वर्ग क्रमांक आठ येथे पर्यवेक्षक कांतिनाथ जोशी यांनी प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उमेदवारांना उत्तरपत्रिका दिली़ या वर्गातील शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ वर्गातील शेजारच्या उमेदवारांना त्याबाबत शंका आली़ प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली जात असल्याबाबत त्यांनी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले़ काही वेळाने वर्गातील सर्व उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर सर्व उमेदवारांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ पर्यवेक्षकाने जाब विचारल्यानंतर शाहीनने बाथरुमला जाण्याचा बहाणा केला़ बाथरुमला गेल्यानंतर ती पायजमा बदलून आली़ कपडे बदलल्यानंतरही तिच्या पायजम्यावर उत्तरे लिहिली असल्याचे निदर्शनास आले़ केंद्र प्रमुखांनी शाहीनची चौकशी केल्यानंतर तिची बोबडी वळाली़ प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वीच शाहीनने अर्ध्याहून अधिक उत्तरे लिहिली होती़ (प्रतिनिधी)सूत्रधार कोण? : आणखी कोणाचा हात?जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सखोल चौकशी केली जात आहे. प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली गेल्याने पेपर फोडण्यामागे शासकीय यंत्रणेतील आणखी काहींचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण?, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. सदस्यांची मागणीजिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी पेपर फुटीवरून जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी या पदाची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार सर्वानुमते आरोग्य सेविकेच्या ३८ जागांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आता प्रशासकीय पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. अशी आहे गुणांची यादी...पदजागाअर्जपरीक्षा दिलेलेउत्तीर्ण औषध निर्माण अधिकारी३४४५३७0१0८आरोग्य सेविका ३८९१५७३३१९९आरोग्य सेवक८४६५२८९३५यादी जाहीर...नियमानुसार बुधवारी झालेल्या परीक्षेच्या गुणांची यादी जिल्हा परिषदेत लावण्यात आली. पेपर फुटीमुळे चर्चेत असलेल्या आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेचा निकाल २७ टक्के इतकाच लागला आहे. ३८ जागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. यापैकी ७३३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील १९९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पोलिसांकडून दोघींची कसून चौकशीशाहिन जमादार व तिला मदत करणारी शकिरा उमराणी या दोघींवर परीक्षेला कॉपी केल्याचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघींनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. केंद्र प्रमुखांकडे कोणतीच तक्रार न आल्याने, त्यांनी पोलिसांत कॉपी केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या तरी कॉपीची तक्रार दाखल असून त्या दोघींना अटक केली आहे. आता पेपर कसा फुटला, याची चौकशी तपासात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.