पंकज उधास यांच्या गजल गायनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:43 PM2017-11-12T23:43:33+5:302017-11-12T23:44:10+5:30

Pankaj Udhas's ghazal singing has a fascinating spellbinding | पंकज उधास यांच्या गजल गायनाने रसिक मंत्रमुग्ध

पंकज उधास यांच्या गजल गायनाने रसिक मंत्रमुग्ध

Next


सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात असाच काहीसा सांगीतिक अनुभव सांगलीकरांना पंकज उधास यांच्या आवाजाच्या माध्यमातून घेता आला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनित्तिम वसंतदादा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गजलगायक पंकज उधास यांच्या मैफलीने सांगलीकर मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, नगरसेवक राजेश नाईक, विष्णू माने, बाळासाहेब गोंधळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करून मैफलीला सुरूवात झाली.
मैफलीत पंकज उधास यांनी गेली ३५ वर्षे ते गात असलेल्या आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाºया त्यांच्या आवडत्या गजल सादर केल्या. संगीत रसिकांसाठी आणि त्यातही पंकज उधास यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा हा कार्यक्रम जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारा ठरला. मैफलीची सुरूवातच त्यांनी ‘वो बडे खुशनसीब होते है, जो आप जिनके करीब होते है’ या गजलने केली. त्यानंतर त्यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा देत दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. राज्याच्या शैक्षणिक, शेती, सिंचन, औद्योगिक विकासात त्यांचे मोठे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्र देशात नंबर एकचे राज्य असल्याचे गौरवोद््गार यावेळी त्यांनी काढले.
त्यानंतर त्यांनी मुमताज रशीद यांची ‘निकलो ना बेनकाब, जमाना खराब है’ ही गजल सादर केली. ‘दिवारों से मिलकर रोना, अच्छा लगता है’, ‘सबको मालूम है, मै शराबी नही’, हुई महेंगी बहोत शराब, थोडी थोडी पिया करो’, अशा अनेक सरस गजल सादर करीत सांगलीकरांना खिळवून ठेवले. ‘साजन’ चित्रपटातील ‘जियो तो जिये कैसे’, ‘चिठ्ठी आई है’ या गजलना तर रसिकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली. ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘और और अहिस्ता किजीये बाते, धडकन कोई सुन रहा होगा’ या अशा गजलांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
स्मारकस्थळी आज अभिवादन
कृष्णाकाठावरील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकस्थळी सोमवारी सकाळी नऊ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील प्रमुख नेते, आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी वसंतदादा महोत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री नेहा पेंडसे यांचा नृत्याविष्कार, शिवमणी, रवी चारी व संगीत हल्दीपूर यांचा संगीतमय कार्यक्रम येथील आंबेडकर क्रीडांगणावर होणार आहे.
मदनभाऊ युवा मंचतर्फे प्रदर्शन
वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मदनभाऊ पाटील युवा मंचच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर वसंतदादांच्या जीवनातील अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद््घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pankaj Udhas's ghazal singing has a fascinating spellbinding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.