शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटेश माडगूळकरांची चौथी पिढी साहित्यक्षेत्रात, १३ वर्षाच्या पलोमाचा कवितासंग्रह होणार प्रकाशित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:54 IST

लक्ष्मण सरगर आटपाडी : मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी, थोर साहित्यिक गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी, थोर साहित्यिक गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची पणती पलोमा माडगूळकर यांचा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने माडगूळकरांच्या चौथ्या पिढीचे साहित्यात पदार्पण होत आहे.

महाकवी ग. दि. माडगूळकर व व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी साहित्यात मैलाचे दगड रचले. मराठी साहित्य रसिकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. माडगूळकरांच्या पुढच्या पिढ्यांनीही साहित्य, राजकारण, माहिती तंत्रज्ञान, अशा अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला.गदिमांची चौथी पिढी आता साहित्य क्षेत्रात प्रवेश करते आहे व तेही वयाच्या १३ व्या वर्षी. ग. दि. मा., व्यंकटेशतात्यांच्या पणतीने अर्थात पलोमाने कमी वयात शासननियुक्त ग. दि. माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटिक यांनी साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केल्याबद्दल पलोमाचे अभिनंदन केले आहे.

इंग्रजी काव्यसंग्रहाचे १९ रोजी प्रकाशनपलोमा सुमित्र माडगूळकर हिच्या ‘द नॅसेंट ब्लॉसम’ म्हणजेच मराठीत ‘नवी पालवी/नवा बहर’ या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन येत्या १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवाजीनगर, पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या लता मंगेशकर हॉल येथे होत आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, इंग्रजी भाषा अभ्यासक विनया बापट उपस्थित राहणार आहेत.

माझिया रक्तात, ‘गदिमांचा’ अंशपलोमाकडे गदिमा व तात्यांकडे असलेला चित्रकलेचा गुणही आला आहे. पलोमाने मराठी काव्य पाठांतर व हिंदी काव्य पाठांतर आंतरशालेय स्पर्धेत पुण्यात प्रथम पुरस्कार मिळवला आहे. माडगूळकर कुटुंबातील या नव्या पालवीचे मराठी रसिक प्रेमाने स्वागत करतील अशी आशा आहे. तिला प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. मोठ्या विनम्रपणे ती म्हणते “ज्ञानियाचा वा तुकयाचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ‘गदिमांचा’ अंश आहे!”

टॅग्स :Sangliसांगली