शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पलूस कुपोषण मुक्तीच्या मार्गावर -: नवनवीन योजनांना नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:09 IST

४ दुर्धर म्हणजे काहींना हृदयविकार आहे, तर काही अस्थिव्यंग आहेत. ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या प्रयत्नांना यश प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने गृहभेटी घेऊन पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येत आहे

अशुतोष कस्तुरे ।पलूस : पंचायत समितीचा महिला व बालकल्याण विभाग आणि नागरिकांच्या मदतीने पलूस तालुका कुपोषण मुक्तीच्या मार्गावर आहे. तालुक्यातील ० ते ६ वयोगटातील कुपोषित मुलांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. शासन स्तरावरुन कुपोषण मुक्तीसाठी केलेले प्रयत्न फळास येत आहेत.

गतवर्षी तालुक्यात वजनानुसार ३६, तर उंचीनुसार ९० बालके कुपोषित होती. त्यांची संख्या यावर्षी घटून वजनानुसार ३०, तर उंचीनुसार २२ राहिलेली आहेत. पैकी त्यातीलही ४ दुर्धर म्हणजे काहींना हृदयविकार आहे, तर काही अस्थिव्यंग आहेत. ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आहेत.

उंचीनुसार प्रकारात कुपोषणाच्या तीव्रतेनुसार त्यांच्यात सॅम आणि मॅम असे दोन प्रकार पडतात. गतवर्षी सॅम म्हणजे तीव्र कुपोषितांमध्ये २५ बालके होती, ती सध्या ७ आहेत, तर मॅम म्हणजे कमी तीव्र कुपोषितांमध्ये ६५ बालके होती, ती सध्या १५ बालके राहिली आहेत.

जिल्हा परिषद पूर्ण जिल्हाभर कुपोषण मुक्तीची चळवळ राबवित आहे. त्याचाच भाग म्हणून पलूस पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडून तालुक्यात कुपोषण मुक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला बऱ्याच प्रमाणात यश येताना दिसत आहे. या विभागाकडून अंगणवाडीमधील प्रत्येक बालकावर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने नवनवीन योजना राबवित आहे. येथील विद्यार्थांना व्हीसीडीसीच्या माध्यमातून दिवसातून ८ वेळा गहू आणि मुगाची लापसी तयार करुन दिली जाते. तसेच इडीएनएफच्या माध्यमातून मुलांच्या आवडीनुसार दिवसातून ४ वेळा खाण्यासाठी खाऊ दिला जातो. तसेच तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून अशा बालकांवर विशेष लक्ष देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने गृहभेटी घेऊन पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येत आहे आणि अशा बालकांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याबाबत सुचविले जात आहे. या माध्यमातून पलूस तालुका कुपोषणमुक्त करण्याचा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहे.तालुक्यात उंचीनुसार गाववार कुपोषित बालकेगाव सॅमनुसार मॅमनुसारसंख्या संख्याबुर्ली १ १अंकलखोप २ ५सावंतपूर १ —कुंडल ३ २आमणापूर — १भिलवडी — २पलूस — २बांबवडे — २एकूण ७ १५वजनानुसार गाववार कुपोषित बालकेगाव संख्याबुर्ली २अंकलखोप ४सावंतपूर २कुंडल ४आमणापूर २भिलवडी ३पलूस ४रामानंदनगर ३दुधोंडी ४नागराळे २एकूण ३०

 

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीय