शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:20 IST

बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत.

सांगली : गायी व म्हशींना दुधाचा पान्हा फुटण्यासाठी अनधिकृतपणे ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. हे इंजेक्शन गुरांनाही घातक ठरते. इंजेक्शन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढण्याचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.गायी किंवा म्हशींना पाणवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. असे दूध प्यायल्यास हृदयाची धडधड, पोटाचे विकार वाढणे, स्नायू कमकुवत होण्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. या इंजेक्शनचा वापर मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.चोरीछुप्या पद्धतीने काही दूधविक्रेत्यांकडून सर्रासपणे ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे. बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, गुरांनाही हे इंजेक्शन घातक ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ऑक्सिटोसिन वापरावर बंदी घालण्यात आल्याचेही जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने सांगितले. या इंजेक्शनची विक्री व वापर होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

गाय, म्हशीला पान्हा फुटावा म्हणून...दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या काही जणांकडून वासराला गायीजवळ न जाऊ देता ऑक्सिटोसिन इंजेक्शन देऊन पान्हा फोडतात. म्हशीला पान्हा फोडण्यासाठीही इंजेक्शनचा वापर होत आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवतींसाठीही वापरऑक्सिटोसिन हे इंजेक्शन संप्रेरक असून, यामुळे गर्भवतीला प्रसूतीदरम्यान कळा येतात. तसेच दुधाचा पान्हाही फुटतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर होतो.

ऑक्सिटोसिनयुक्त दूध प्यायल्यास...ऑक्सिटोसिनयुक्त दूध प्यायल्याने मानवाच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. तसेच पोटाचे विकार होण्याची भीती असते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

गायी किवा म्हशींना पान्हा फोडण्यासाठी ऑक्सिटोसिन या इंजेक्शनचा वापर करण्यावर बंदी आहे. गाय, म्हशीला इंजेक्शन देऊन पान्हा फोडल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. तो माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याच बरोबर गुरांसाठीही हे इंजेक्शन धोक्याचे आहे. त्यामुळे या इंजेक्शनवर बंदी घालण्यात आली आहे. पशुपालकांनी या इंजेक्शनचा वापर करू नये. - सुकुमार चौगुले, अन्न व औषध प्रशासन अधिकारी. 

ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन गाय किंवा म्हशीसाठी वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, तसे केल्यास संबंधित पशुपालकावर कारवाई करण्यात येईल. - डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध