शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

भाजपची सत्ता उलथवून टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:30 IST

ऐतवडे बुद्रुक : लोकांना कायम गुंगीत ठेवून, कायम आपल्याच हाती सत्ता ठेवण्याची हिटलरची पद्धत नरेंद्र मोदी भारतात वापरत आहेत. परंतु सध्या लोकजागृती होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात समविचारी पक्ष एकत्र येऊन देशातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकतील, असा विश्वास राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त ...

ऐतवडे बुद्रुक : लोकांना कायम गुंगीत ठेवून, कायम आपल्याच हाती सत्ता ठेवण्याची हिटलरची पद्धत नरेंद्र मोदी भारतात वापरत आहेत. परंतु सध्या लोकजागृती होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात समविचारी पक्ष एकत्र येऊन देशातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकतील, असा विश्वास राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे भाजपमधून राष्टÑवादीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, पशुवैद्यकीय रूग्णालयात कर्मचारी निवासस्थान इमारत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील प्रसुतिगृहाचे उद्घाटन, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. आ. जयंत पाटील म्हणाले, पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला संपवू, अशी वल्गना करणाऱ्या भाजपने आतंकवाद पसरविणाºया पीडीपीसारख्या पक्षाशी सत्तेसाठी युती केली. त्यामुळे जवानांचे नाहक बलिदान होत आहे व आतंकवाद पसरतच आहे. विशिष्ट विचारधारा असणारे हे लोक राज्यघटना बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने संविधान बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दलित आरक्षण बदलू पाहणारे धनगर आरक्षण, मराठा आरक्षण याबद्दल काय भूमिका घेणार, याकडे लोकांचे लक्ष आहे. सर्वधर्मसमभाव मानणाºया पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्यासारख्या समाजसुधारकांची हत्या करणाºया प्रवृतींना पाठीशी घालण्याचे पाप हे लोक करीत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धनगर, मुस्लिम व मराठा आरक्षण रखडले आहे. सध्या न्यायव्यवस्था व न्यायाधीशही सुरक्षित नाहीत.शेतकºयांच्या हिताचे कोणतेही निर्णय या सरकारने घेतलेले नाहीत. साखरधंदा केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आला. तूर, कापूस, सोयाबीनला आधारभूत किंमत नाही. दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.राष्टÑवादीने माझ्यावर राज्याची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्टÑात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर १ ला असणार आहे. तरी आपल्या हक्काच्या तासगाव, इस्लामपूर व शिराळा या तीन जागा लोकांनी व कार्यकर्त्यांनीच निवडून आणल्या पाहिजेत. ऐतवडे बुद्रुक गावाच्या विकासासाठी पाणी असणे गरजेचे असून शहाजी गायकवाड हे त्यादृष्टीने उत्तम काम करीत आहेत, असेही पाटील म्हणाले.यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ग्रामीण भाग व शेतकºयांना समजून घेणारे सरकार असणे सध्या गरजेचे आहे. राष्टÑवादीच्या माध्यमातून राज्याला अग्रेसर करण्यासाठी सहकार्य करावे.यावेळी राष्टÑवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीना मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, संचालक शहाजी गायकवाड, तालुका सभापती सचिन हुलवान, पंचायत समिती सदस्या धनश्री माने, डॉ. धनंजय माने, शेखरवाडीचे सरपंच बबन माळी, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, ढगेवाडीचे संदीप सावंत, डोंगरवाडीचे दशरथ लबडे, बाळासाहेब पाटील, अनिरुद्ध गायकवाड, केदारनाथ खडके, शंकर घोडके, अरविंद गायकवाड, प्रकाश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.