शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:35 IST

कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या सदस्याला बांधकाम सभापतीपद दिले. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट नाराज झाल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमहाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्कामाजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट नाराज

अशोक पाटील इस्लामपूर : कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या सदस्याला बांधकाम सभापतीपद दिले. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट नाराज झाल्याची चर्चा आहे.विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघात माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख गट भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले, तेव्हा राष्ट्रवादीचा पराजय, असे समीकरण बनले होते. मात्र सम्राट महाडिक यांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडली. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेठनाक्यावरील महाडिक गटाचे राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश मिळाला.एकीकडे सत्यजित देशमुख यांना आमदारपदाची आॅफर देऊन भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद वाढविण्याची खेळी भाजपने केली, मात्र सम्राट महाडिक यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे महाडिक यांची बंडखोरी भाजपवरच उलटली. चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही गटांना आमदारपदाचे दाखविलेले गाजर भोवले.

इस्लामपूर मतदार संघात आमदार सदाभाऊ खोत, महाडिक युवा शक्ती, हुतात्मा संकुलाचे वैभव व गौरव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भीमराव माने, आष्टा पालिकेतील वैभव शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे हे गट एकत्र आलेच नाहीत. त्यामुळे इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजय सुकर झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली