शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शालाबाह्य मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात ! : शिक्षकांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:52 IST

अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

सचिन काकडे ।सातारा : गरिबीचे चटके सोसणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलांना आज शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा मुलांना मग मिळेल ते काम करावं लागतं अथवा दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागतात. अशा शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पालिका शाळांचा भौतिक, गुणात्मक विकास साधण्यासाठी नववर्षात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ या शिक्षकांनी केला आहे.

ज्ञानेश्वर कांबळे हे पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक २ तर अजित बल्लाळ हे ज्ञानदीप विद्यामंदिर शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्ञानेश्वर कांबळे यांनी फूटपाथ व रस्त्यावर, बसून व्यवसाय करणाºया परप्रांतीय तसेच झोपडपट्टीतील सुमारे ४५ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर अजित बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. नववर्षात या शिक्षकांनी अशा शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेमी इंग्रजी व प्ले ग्रुपचे वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

पालिका शाळा हळूहळू कात टाकू लागल्या असून, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासही होऊ लागला आहे. गुणवत्तेचा हा आलेख वाढविण्यासाठी शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर परीक्षा घेणे असे उपक्रम या वर्षात राबविणार असल्याचे पालिकेचे शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे व अजित बल्लाळ यांनी सांगितले. हे करीत असतानाच शिक्षणापासून भरकटत चाललेल्या तसेच शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार या शिक्षकांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

 

पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. सेमी इंग्रजी, प्ले ग्रुपचे वर्ग आता या शाळांमध्येही सुरू झाले आहेत. आतापर्यंत अनेक शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हा उपक्रम अविरतपणे सुरूच राहणार आहे.- ज्ञानेश्वर कांबळे, शिक्षक, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर, शाळा क्र. २

 

विद्यार्थ्यांना बौद्धिक व गुणात्मक विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ई-लर्निंग क्लासमुळे बऱ्याच अडचणी संपुष्टात आल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत आता पालिका शाळाही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.- अजित बल्लाळ, शिक्षक, ज्ञानदीप विद्यामंदिर, शाळा क्र. १६

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक