शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मला मतदारसंघात अडकून ठेवण्याचा विरोधकांचा डाव, पण..; जयंत पाटील यांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:20 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल

इस्लामपूर : आपणास मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न होणार आहेत. मात्र माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथ शहरातील विविध पदाधिकारी, बूथ अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी घेतली.इस्लामपूर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ अध्यक्षांना निवड पत्रे प्रदान समारंभात बोलत होते. यावेळी सर्वोत्कृष्ट काम केलेल्या पाच बूथ अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतीक पाटील, यशवंत गोसावी, ॲड. चिमण डांगे, शहाजीबापू पाटील, प्रा. शामराव पाटील, अरुणादेवी पाटील, विजय पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील उपस्थित होते. विक्रमी मताधिक्य देणाऱ्या बूथना बक्षिसे जाहीरयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृष्णेचे संचालक संजय पाटील, व राजारामबापूचे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून विधानसभेला विक्रमी मताधिक्य देणाऱ्या बूथना अनुक्रमे १ लाख व ५० हजाराचे बक्षिसे जाहीर केली. यावेळी यशवंत गोसावी, ॲड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचीही मनोगते झाली. शहाजीबापू पाटील यांनी स्वागत केले. अभिजित रासकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विश्वनाथ डांगे,धैर्यशील पाटील, सुभाष सूर्यवंशी, अरुण कांबळे, सुरेंद्र पाटील, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर, शंकरराव चव्हाण, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, दीपाली साधू उपस्थित होते.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईलआमदार जयंत पाटील म्हणाले, लोकसभा प्रमाणे विधानसभेला ही राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जनतेचे मोठे पाठबळ मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. आपले सरकार आल्यानंतर शहरातील, तालुक्यातील उर्वरित विकास कामांना गती देऊ.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभा