शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जतमध्ये विरोध नेते एकत्र आले, हास्य रंगात रंगून गेले; विलासराव जगतापांच्या घरी चहापान कार्यक्रम

By अविनाश कोळी | Updated: December 18, 2023 19:03 IST

कार्यकर्ते झुंज खेळत असताना नेत्यांनी राजकीय वैरत्व बाजुला ठेवून गळ्यात गळे घातले

जत : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे पक्षातीलच खासदार संजय पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर व विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्यावर सतत टीका करत असतात. मात्र, त्यांच्याच घरी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास हे सारे नेते हास्य रंगात रंगून गेले.माडग्याळ येथील पाणी पूजनाच्या कार्यक्रमास जाण्यापूर्वी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, गोपीचंद पडळकर व विक्रमसिंह सावंत यांचे एकत्र चहापान झाले. यात गप्पाही रंगल्या होत्या. मात्र, या गप्पांचे हे क्षण काही कार्यकर्त्यांनी टिपले व ते सोशल मिडियावर दिले. ‘बघा, नेतेमंडळी एकत्रच असतात, आम्ही मात्र त्यांच्यासाठी भांडत असतो’ असे वाक्यही त्याखाली टाकण्यात आले होते.माडग्याळच्या पाण्याचा श्रेयवाद विकोपाला पोहोचला होता. भाजप-काँग्रेस कार्यकर्ते सोशल मिडियात भिडले होते. त्यामुळे कार्यक्रमात राडा होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, झाले वेगळेच. माजी आमदार विलासराव जगताप हे भाजप नेते असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय पाटील, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बिनसले आहे. ते माडग्याळला जाण्यापूर्वी पाटील, पडळकर व विक्रमसिंह सावंत थेट विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. नाष्टा केला. इकडे कार्यकर्ते बाह्या सरसावून बसले असताना नेत्यांनी प्रेमाचे लाडू खाल्ले. कार्यकर्ते झुंज खेळत असताना नेत्यांनी राजकीय वैरत्व बाजुला ठेवून गळ्यात गळे घातले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण