शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडून केवळ समस्यांचा पाऊस

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

सदाभाऊंची आढावा बैठक : जिल्ह्याच्या विकासाची समन्वयातून नवी दिशा निर्माण करण्याचे आवाहन

सांगली : जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्यास उशीर लागला असला तरी मिळालेल्या संधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करणार आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न गंभीर असून यावर तातडीने मुंबईत बैठक घेणार आहे. अडचणींवर मात करत प्रशासन व शासन यांनी टीमवर्क दाखवत जिल्ह्याच्या विकासाची नवी दिशा निर्माण करूया, असे आवाहन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, मंत्री खोत यांनी बोलाविलेल्या पहिल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी मात्र, विकासकामांना बगल देत समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री खोत यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. खोत म्हणाले की, पदभार हाती घेताच व्यापाऱ्यांच्या संपाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात येण्यास उशीर झाला. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नावर अधिवेशन काळात बैठका घेऊन हे प्रश्न सोडविले जातील. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून या विषयावर जिल्ह्यातील आमदारांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर निधीत जास्तीत जास्त विकास कामांवर खर्च व्हायला पाहिजे. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना एक महत्त्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजनांची कामे ‘जलयुक्त’मधून करता येतील का याबाबत प्रशासनाने अहवाल तयार करावा. टीमवर्कने काम करूया, विकास आपोआप साधला जाईल. बैठकीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना, जिल्ह्यातील प्रमुख अडचणी व त्यावर कशी मात करता येऊ शकते हे सांगत, जिल्ह्यात झालेल्या चांगल्या कामाचा आढावाही मांडला. त्यानंतर जवळपास सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची ओळख करून देत विभागातील अडचणी मंत्र्यांसमोर मांडत त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना औद्योगिक दराने वीजबिले येत असून ती कृषिपंपांच्या दराने आल्यास योजनेच्या थकबाकीची अडचण निर्माण होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वाकुर्डे योजनेतून सदाभाऊंच्याच मरळनाथपूरला कधी पाणी मिळणार? असा सवाल आ. शिवाजीराव नाईक यांनी करत, आता तरी काम पूर्ण करण्याची मागणी केली. कृषीच्या आढाव्यावेळी हुमनी व गोगलगाईचा प्रार्दुभाव वाढत असून त्यावर उपाययोजना सुरू असून त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली. फळबाग विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत तर पीक विमा योजनेला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे यावेळी खोत यांनी सांगितले. स्वतंत्र सांगली तालुका व जत तालुक्याचे विभाजन हे प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित असून यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, आयुक्त रवींद्र खेबूडकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिकेला हवेत १०५ कोटी रूपयेसर्व विभागांचा आढावा झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापालिका क्षेत्रातील प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले. शासनाकडून २९१ कोटींचा निधी येणार असून यातील १०५ कोटींचा निधी राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. यात ड्रेनेजचे ५० कोटी, वीज खांब, अंतर्गत वीजवाहिनीसाठीचा निधी, झोपडपट्टी पुनर्वसनचा १० कोटी, तर यासाठी अजून २२ कोटींची, तर गुंठेवारी विकास योजनेसाठी १५ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावर मंत्रालयात बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश खोत यांनी दिले. रिक्त जागांच्या संख्येने मंत्रीही अवाक्राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलाविलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत आढावा मांडताना सर्वच प्रमुखांनी रिक्त जागांचा प्रश्न मांडला. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील १० पैकी ६ गटविकास अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे सांगितले. इतरही तांत्रिक अधिकाऱ्यांच्या जागाही रिक्त असून पशुसंवर्धन विभागातही ४६ पदे रिक्त असल्याचे सांगितले. प्रत्येक अधिकारी आपली ओळख सांगताना विभागाकडे असणाऱ्या रिक्त जागा सांगत असल्याने, अखेर खोत यांनी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.