शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

बैलगाडी शर्यतीमागे केवळ मतांचे राजकारण : एस. के. मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:33 IST

बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही काही ठिकाणी शर्यतींचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडे येत असते. शर्यतीत जनावरांना अतोनात त्रास देण्यात येऊन त्यांच्यावर

ठळक मुद्देजनावरांना त्रास दिल्यास कायदा आपले काम करेल; पोलीस प्रशासनाने कारवाईबाबत दक्ष राहावे

सांगली : बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही काही ठिकाणी शर्यतींचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडे येत असते. शर्यतीत जनावरांना अतोनात त्रास देण्यात येऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात.

हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे. प्रामुख्याने शर्यती आयोजित करण्यामागे मतांचे राजकारण असल्याची टीका अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड दिल्लीचे सदस्य डॉ. एस. के. मित्तल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. विभागनिहाय आढावा घेण्यासाठी डॉ. एस. के. मित्तल सांगलीत आले होते.

मित्तल पुढे म्हणाले, प्राणी व मनुष्य यांचे पूर्वीपासून स्नेहाचे नाते आहे. पूर्वीच्या काळी बैलगाडी शर्यती होत होत्या. मात्र यामध्ये मनोरंजन हा निखळ हेतू होता. मात्र सध्या याचे स्वरुप बदलत चालले आहे. आपली गाडी जिंकावी यासाठी त्याला जुंपलेल्या बैलांचा छळ करण्याचे सत्र स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीने आरंभले आहे. विजेचे शॉक देणे, त्यांच्या शेपट्या पिरगाळणे, त्यांना जखमी करणे आदी प्रकार याकरिता अवलंबिले जातात. यामुळे स्पर्धा संपल्यानंतर काही वेळा बैल मृत्युमुखीही पडतात, तर कित्येकांना दुखापती होतात. अनेक जनावरे कायमची जायबंदी होतात.

२०१४ पासून न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रात कोठेही स्पर्धा होत असतील, तर त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे. कायदा प्राण्यांच्या बाजूने असल्याने कोणी न्यायालयाचा आदेश तोडून स्पर्धा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करुन कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनास आहे. साधारणत: शर्यतीमध्ये ज्या बैलांना सहभागी करुन घेण्यात येते, ते बैल त्या परिसरातील नसतात. परगावातून त्यांना आणण्यात येते. जर शर्यतीसाठी बैलांची वाहतूक होत असेल, तर संबंधित वाहनाचा परवाना निलंबित करण्याचे अधिकार प्रशासनास आहेत. त्याचा योग्य वापर करण्याची आवश्यकता आहे. तामिळनाडूत जलीकट्टू ही स्पर्धा होत असली तरी, त्यामध्ये बरीच सुधारणा करण्यात आलेली आहे.

पूर्वी होणाºया स्पर्धांमध्ये सहभागी होणाºया बहुतांशी बैलांचा मृत्यू होत असे. मात्र मागील वर्षापासून हे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारत लोकशाहीप्रधान देश असल्याने येथील कायदे पाळावेच लागतील. कायदा मोडण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नसल्याचेही मित्तल यांनी सांगितले.सध्या केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्यकर्ते शर्यतीचे समर्थन करीत असून ते पूर्णत: चुकीचे आहे, असेही मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हास्तरीय कमिटी नियुक्तअ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डचे सदस्य एस. के. मित्तल यांनी सूचना दिल्यावर काही तासातच जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी, बैलगाडी शर्यती होणार नाहीत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कमिटी गठित केली आहे. जिल्हास्तरीय कमिटीत जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरटीओ अधिकारी यांचा समावेश आहे. शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागरिकांनादेखील मिळाल्यास त्यांनी प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण