शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

जिल्ह्यात ११० गावांत एकच गणपती!

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

संख्या घटली : ‘तंटामुक्ती’चे बक्षीस पटकाविल्यानंतर उपक्रमाचा विसर

सचिन लाड -- सांगली  जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ ११० गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी होत नाहीत. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलीस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत, एखादा अनुचित प्रकार घडला तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला होता.दुष्काळग्रस्तांकडे पाठजिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जमा झालेल्या वर्गणीतील निधी दुष्काळग्रस्तांना देण्याची विनंती करण्यात आली होती. पण याकडे अनेक मंडळांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळे पुढे आली असती, तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबविणाऱ्या गावांची संख्या वाढली असती. योजनेची आकडेवारी...वर्षगावांची संख्या २००५ ७६२००६ ८५२००७ १४५२००८ ३३४२००९ २४५२०१० ३०२२०११ १९४२०१२ २०५२०१३ १५१२०१४ १२४२०१५ ११०जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ व्हावा, यासाठी जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आवाहन केले होते. दुष्काळजन्य स्थिती असल्याने खर्च कमी करावा. गणेशोत्सवासाठी जमा झालेला पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याऐवजी गावपातळीवर शेततळी कामासाठी वापरता आला असता.- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारीगावपातळीवर राजकारण व गट-तट बाजूला ठेवले, तर ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. पण पोलीस व प्रशासनाकडून जनजागृती कमी पडत आहे. लोकवर्गणीचा वापर गावाच्या विधायक कामासाठी होऊ शकतो. बक्षीस मिळविण्यापुरते एकत्रित न येता सातत्य ठेवावे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली जिल्हा सुधार समिती