शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

आता एसटी तिकिटाचेही पैसे द्या ऑनलाइन!, सुट्या पैश्याची कटकट मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:43 IST

ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे वाहकांच्या अनेक कटकटी संपणार

संतोष भिसेसांगली : ऑनलाइन पेमेंटने सारे व्यवहार व्यापलेले असताना एसटी सेवा मात्र अद्याप त्यापासून दूरच आहे. प्रवासामध्ये तिकिटासाठी अजूनही रोख पैसे द्यावे लागतात. सुट्या पैशांसाठी वाहकासोबत अजूनही वाद घालावा लागतो. बदलत्या काळात एसटीनेही बदलण्याचा निर्णय घेतला असून, ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.वाहकांना अँड्रॉईड प्रणालीवर आधारित तिकीट मशिन्स देण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशाकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारता येणार आहे. प्रवाशाने दिलेले पैसे थेट महामंडळाकडे जमा होणार आहेत, त्यामुळे ड्युटी संपल्यावर आगारात कॅशिअरकडे पैसे जमा करून हिशोब देण्याची कटकट संपणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात हजारो रुपयांची रोकड सांभाळण्याची जबाबदारीही कमी होणार आहे.मुक्कामाला गेलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीतील वाहकाला जा झालेले पैसे सोबत घेऊनच एसटीमध्ये रात्र काढावी लागते. कोकणात मुक्कामाला गेलेल्या वाहकांना तर पैसे सांभाळत झोपण्याशिवाय पर्याय नसतो. नव्या प्रणालीमुळे त्यांची डोकेदुखी कमी झाली आहे. ड्युटी संपल्यावर विशिष्ट वेळेच्या आत आगारात पैसे जमा करावे लागतात, अन्यथा वाहकांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागतो. ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे या साऱ्या कटकटी संपणार आहेत. प्रवाशांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे आदी ऑनलाइन पेमेंट प्रणालींद्वारे पैसे देऊन तिकीट काढता येईल.मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची महत्त्वाची बैठक आठवडाभरापूर्वी झाली, त्यामध्ये झालेल्या अनेक निर्णयांसोबत ऑनलाइन व्यवहारांचाही निर्णय झाला. वाहकांकडील तिकिटांची सध्याची ईटीआय मशिन्स अँड्रॉईड प्रणालीला जोडण्याचे ठरले.

टॅग्स :Sangliसांगली