शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शवत!, सांगली जिल्ह्यातील कुंडलापूरमध्ये २१ वर्षांपासून "एक गाव, एक गणपती" उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:23 IST

भजन, कीर्तन, पवाडे, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या घाटमाथ्यावरील ऐतिहासिक कुंडलापूर या गावात गेल्या एकवीस वर्षांपासूनची ''एक गाव,एक गणपती'' ही संकल्पना आजही कायम राबविली जात असल्याने इतर गावांना कुंडलापूर हे गाव आदर्शवत ठरत आहे. कोणताही गोंधळ अथवा तंटा नाही. अगदी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो.कुंडलापूर या गावात एकवीस वर्षांपूर्वी मुख्य चौकात सर्वानुमते ''एक गाव, एक गणपती'' संकल्पना घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्यानुसार ती संकल्पना आज अखेर जपली जात आहे. या ठिकाणच्या गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जनही अलिखित नियमानुसारच कोणताही डामडौल न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरातच केले जाते. जेमतेम सजावट, जेमतेमच रोषणाईसह कार्यक्रमही पारंपरिक पद्धतीनेच केले जातात. भजन, कीर्तन, पवाडे, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विसर्जनही वारकरी संप्रदायानुसारच टाळ मृदंगाच्या तालावर होते.या मंडळाच्या गणेश उत्सवासाठी गावातील आबालवृद्धासह महिलांचाही राबता असतो. अगदी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे येथील गणेश उत्सव हा इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.