शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत गर्दूल्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

By शरद जाधव | Updated: May 11, 2023 17:08 IST

डोक्यात दगड घालून केला होता खून  

सांगली : मिरज येथे गर्दूल्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू शंकर जाधव (वय ३०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर अतुल बाळू कोळी (३९, रा. शेरे ता. कऱ्हाड जि. सातारा) असे मृताचे नाव होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के मलाबादे यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ५ जानेवारी २०२० मध्ये मिरजेत ही घटना घडली होती. आरोपी राजू जाधव हा मिरज येथील मंगल टॉकीजजवळ असलेल्या, जूने बंद पडलेल्या पीएम रूमच्या मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहात रात्री झोपत असे. घटनेच्या दोन दिवस अगोदर जाधव एकदा तिथे झोपला असताना मृत कोळी याने त्याला दगड मारला होता. ५ जानेवारी रोजी आरोपी झोपत असलेल्या स्वच्छतागृहात कोळी झोपला होता. योवळी जाधव याने त्याच्या डोकीत दगड घालून त्याचा खून केला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी संजय शिवाजी पाटील, साक्षीदार अरूण लोंढे, वैद्यकीय अधिकारी सुरेखा गावडे, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या साक्षी ग्राह्य धरून शिक्षा सुनाविण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय