मिरज-कोल्हापूर रस्त्यावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:07+5:302021-08-20T04:31:07+5:30

मिरज : मिरज-कोल्हापूर रस्त्यावर राजपूत परिसरात पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन अमोल परीट (वय ३५, रा. माणगाव, ...

One killed in Miraj-Kolhapur road accident | मिरज-कोल्हापूर रस्त्यावर अपघातात एक ठार

मिरज-कोल्हापूर रस्त्यावर अपघातात एक ठार

मिरज : मिरज-कोल्हापूर रस्त्यावर राजपूत परिसरात पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन अमोल परीट (वय ३५, रा. माणगाव, जि. कोल्हापूर) हा मोटारचालक ठार झाला. अपघातात मोटारीतील अन्य तिघांसह दुसऱ्या मोटारीचा चालकही जखमी झाला. सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील तिघे कपडे व्यापारी मिरजेत वसुलीसाठी मोटारीने (एमएच ०९ ईके ४६७२) गुरुवारी दुपारी बारा वाजता मिरजेकडे येत होते. अंकली फाट्यापासून काही अंतरावर मिरजेतून-कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने (एमएच १० डीजी २४४४) त्यांच्या मोटारीस समोरून धडक दिली. जोरदार धडकेत मोटारीचे नुकसान होऊन मिरजेकडे जाणाऱ्या मोटारीची दिशा बदलली होती.

मिरजेकडे येणाऱ्या मोटारीतील चाैघांना जोराची धडक बसून चालक अमोल परीट हा गंभीर जखमी झाला. मोटारीतील इतर तिघांसह चालक परीट यास उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना अमोल परीट याचा मृत्यू झाला. जखमी इतर तिघांसह दुसऱ्या मोटारीचा चालक निरंजन शेट्टी (वय ३२, रा. आरग, ता. मिरज) यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: One killed in Miraj-Kolhapur road accident