शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेचे जेवण करून जाताना दुचाकी घसरून एक ठार, आष्टा-नागाव रस्त्यावर अपघात

By श्रीनिवास नागे | Updated: April 15, 2023 17:13 IST

आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

सांगली : आष्टा येथे आष्टा-नागाव रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्रकाश विठ्ठल गायकवाड (वय ५२, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ठार, तर संग्राम तानाजी सूर्यवंशी (२७, रा. जुने पारगाव) जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

जुने पारगाव येथील संग्राम सूर्यवंशी व प्रकाश गायकवाड शुक्रवारी मर्दवाडी (ता. वाळवा) येथे हनुमान यात्रेनिमित्त सूर्यवंशी यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी आले होते. जेवण केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते दुचाकीवरून (एमएच ०९ बीएच ८३२४) जुने पारगावकडे निघाले होते. रात्री जोरदार वारे व विजांचा कडकडाट सुरू असल्याने ते काही काळ आष्टा येथे थांबले. यानंतर त्यांनी मुख्य रस्त्याऐवजी आष्टा-नागाव मार्गे जुने पारगावकडे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत नागावनजीक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकींच्या दिव्यांचा प्रकाश व वादळी वाऱ्यामुळे गायकवाड यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यामुळे दुचाकी घसरली. यात प्रकाश गायकवाड रस्त्यावर उजव्या बाजूला पडले. त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. संग्राम सूर्यवंशी किरकोळ जखमी झाला.

पोलिस निरीक्षक अजित सिद्, सहायक पोलिस निरीक्षक आप्पासाहेब बाबर, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली. प्रकाश गायकवाड यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. आष्टा येथील शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे संचालक दीपक शिंदे यांचे ते मेहुणे होत.हेल्मेट असते तर...प्रकाश गायकवाड यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता. त्यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दीपक शिंदे यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी दाखल झाला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात