शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात संसर्गजन्य रोगाने दीड हजार डुकरांचा मृत्यू, कुत्री पिसळण्याचा धोका; स्वच्छता मोहीमेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:26 IST

परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

आष्टा : आष्टा शहरात कोलाटी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर डुकरे पालनाचा व्यवसाय करण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांत संसर्गजन्य रोगामुळे सुमारे दीड हजार लहान-मोठी डुकरे दगावल्याने शहरात खळबळ माजली आहे. यात सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले आहे.आष्टा बसस्थानकाच्या समोरील बाजूला कोलाटी समाज वास्तव्यास आहे. या समाजातील नागरिकांकडून डुक्कर पालनाचा व्यवसाय वर्षानुवर्षे करण्यात येतो. शहरातील विविध गल्लीबोळात तसेच उपनगरात डुकरांचा वावर आहे. काही नागरिकांच्या तक्रारीमुळे पालिकेने त्यांना हा व्यवसाय बंद करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र, हा व्यवसाय बंद झालेला नाही.मागील काही दिवसांपूर्वी संकेश्वर परिसरातून नवीन डुकरे आणली होती. यानंतर डुकरे मृत होण्याची मालिका सुरू झाली. यामुळे संकेश्वरमधील डुकरांमुळेे हा संसर्ग झाला असावा, अशा अंदाज वर्तविला जात आहे. आष्ट्यासह इस्लामपूर, इचलकरंजी व कर्नाटकातील अनेक गावांत डुकरांचा मृत्यू झाला आहे.सोमवारी सकाळी कोलाटी समाजाच्या वस्तीनजीकच गटारीमध्ये व परिसरात अनेक डुकरे मरून पडल्याने सर्वत्र दुर्गंधी निर्माण झाली. त्यानंतर बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या वतीने पालिकेत याबाबत तक्रार केली

आष्टा शहरातील रमेश मोरे, विकी मोरे, विलास मोरे, विजय मोरे, रावसाहेब मोरे, प्रकाश मोरे, रामा मोरे, विनोद मोरे यांची डुकरे दगावली आहेत. त्यांनी याबाबत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. नगरसेवक विजय मोरे यांनी पालिकेला याबाबत माहिती दिली आहे.आष्टा पालिकेच्या वतीने मृत्यू पावलेल्या डुकरांची पालिकेच्या घंटागाडी व ट्रॅक्टरमधून पालिकेच्या कचरा डेपोच्या जागेत व नागाव रस्त्याकडेच्या ओढ्यामध्ये विल्हेवाट लावली आहे.

दुर्गंधीचे साम्राज्यआष्टा शहरातील स्वच्छता करण्याचे काम कोलाटी समाजातील स्त्री व पुरुष करीत आहेत. मात्र, ते वास्तव्य करीत असलेल्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. गटारी कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. पालिकेचे या परिसरात दुर्लक्ष आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.

कुत्र्यांनाही धोकाशहरात आनंद कॉलनी, शिराळकर कॉलनी, चितारे कॉलनी, लगोड बंद, भाजी मंडई, नगरपालिका, गांधीनगर, दत्त वसाहत, थोटे गल्ली, जैन गल्ली परिसरात डुकरे दगावली आहेत. याचा संसर्ग होऊन कुत्री पिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगली