शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख गिरणी कामगार अडकले घरासाठी कागदपत्रांच्या चक्रव्युहात

By संतोष भिसे | Updated: September 26, 2023 18:18 IST

पुनवत : म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केलेल्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना ...

पुनवत : म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केलेल्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना गिरणी कामगारांची पुरती दमछाक होत आहे. घरांसाठी अर्ज करताना कागदपत्रांचे पुरावे जोडले आहेत, त्यानंतरही पात्रता निश्चितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत.मुंबईतील बंद किंवा आजारी पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांनी सुमारे १० वर्षांपूर्वी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केले होते. सांगली जिल्ह्यातील हजारो गिरणी कामगारांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी काहींना मुंबईत घरे मिळाली. त्यानंतरही अद्याप सुमारे दीड लाख कामगार घरांपासून वंचित आहेत. त्यांना सध्या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी म्हाडातर्फे कालबद्ध अभियान राबविण्यात येत आहे.म्हाडाच्या कागदपत्रांच्या भल्यामोठ्या यादीमुळे गिरणी कामगारांना पुन्हा एकदा कागदपत्रे शोधण्याची वेळ आली आहे. अनेक गिरणी कामगार अर्ज केल्यानंतर मयत झाले आहेत. सध्या त्यांच्या वारसांची तारांबळ उडाली आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचीही समस्या येत आहे. शिवाय आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

गिरण्यांकडे कागद, पुन्हा कशासाठी मागणी?गिरण्यांकडे कामगारांचे रेकॉर्ड असताना, तसेच अर्ज करतेवेळी कागदपत्रे सादर केलेली असताना आता पुन्हा ती अपलोड कशासाठी करायची? असा प्रश्न लाभार्थ्यांनी विचारला आहे.

अपलोड करावयाची कागदपत्रे कामगारांचे ओळखपत्र, तिकीट क्रमांकाचे दस्ताऐवज, सेवा प्रमाणपत्र, लाल पास, डिस्चार्ज ऑर्डर, फंड पावती, इएसआयसी कार्ड, गिरणीचे प्रमाणपत्र, हजेरी पत्रक, रजा पत्रक, सेवानिवृत्ती उपदान आदेश, सेवानिवृत्ती अदा आदेश, पगार पावती, आधारकार्ड अशी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. यातील काही कागदपत्रांतील त्रुटींमुळे कामगारांची दमछाक होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीHomeसुंदर गृहनियोजनmhadaम्हाडा