शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविजेतेपदानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीकरांमध्ये नवचैतन्य, संकुलाच्या मागणीला मिळाले ‘बळ’

By घनशाम नवाथे | Updated: December 14, 2024 12:22 IST

घनशाम नवाथे सांगली : जागतिक बुद्धिबळाच्या पटावर डी. गुकेशने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून ...

घनशाम नवाथे

सांगली : जागतिक बुद्धिबळाच्या पटावर डी. गुकेशने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळ पंढरी सांगलीत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. बुद्धिबळाचा इथला वारसा, परंपरा कायम ठेवून जागतिक पटावर सांगलीचा लौकीक कायम ठेवण्यासाठी नवी ‘चाल’ खेळण्याचे बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, बुद्धिबळ संकुलाचे अपूर्ण स्वप्न साकारण्यासाठी आणखी नवी ‘खेळी’ खेळली जाईल, असे दिसून आले.नाट्यपंढरी सांगलीची बुद्धिबळ पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्यात नूतन बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. १९४२ मध्ये नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे संस्थापक तथा बुद्धिबळाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पडसलगीकर यांनी बुद्धिबळाला वाहून घेतले होते. देशात बुद्धिबळाच्या स्पर्धामधून सांगलीची वेगळी ओळख त्यांनी करून दिली. अनेक खेळाडू या पंढरीत दरवर्षी बुद्धिबळ खेळण्यासाठी येतात. कोरोनाच्या काळात खेळ थांबल्यानंतर सांगलीतून जगभरात सर्वाधिक ऑनलाइन स्पर्धा सांगलीतून घेतल्या गेल्या. जागतिक बुद्धिबळाच्या पटावर सांगलीचे स्थान अधोरेखित झालेले आहे.बुद्धिबळ संकुल उभारण्याचे पडसलगीकर यांचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. ज्याप्रमाणे हरियाणात कुस्तीसाठी प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे सांगलीत बुद्धिबळाचे संकुल साकारण्यासाठी बुद्धिबळावर प्रेम करणारी मंडळी प्रयत्नशील आहेत. पडसलगीकर यांच्या पश्चात अनेक मंडळी त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. आता विश्वविजेतेपद डी. गुकेश याने पटकावल्यानंतर सांगलीमध्ये पुन्हा नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भाऊसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘बळ’ मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

सांगलीत जल्लोषडी. गुकेश याने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर सांगलीतील विविध चेस ॲकॅडमी आणि त्यांचे खेळाडू एकत्र आले. त्यांनी जल्लोष केला. पेढे, साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. शेकडो खेळाडूंना समाज माध्यमावरही आनंद व्यक्त केला.

नाट्यपंढरी सांगलीने बुद्धिबळात पारदर्शकतेतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या खेळाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा वातावरण निर्माण झाले आहे. बुद्धिबळ संकुल साकारण्यासाठी अनेक मंडळी सरसावली आहेत. विश्वविजेतेपद भारताला मिळाल्यामुळे खेळाडू, पालक यांच्यातही उत्साहाचे वातावरण आहे. - चिदंबर कोटीभास्कर, उपाध्यक्ष, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना. 

कमी वयात डी. गुकेशने विजेतेपद पटकावल्यामुळे नवीन खेळाडूंना याचा निश्चित फायदा होईल. या खेळाकडे करिअर म्हणून बघता येईल. विश्वविजेतेपदामुळे या खेळाकडे अनेकांचा ओढा वाढेल. डी. गुकेश याचे वडील सर्जन आहेत. त्यांनी करिअर बाजूला ठेवून त्याच्या खेळाकडे लक्ष दिले. तर आईने सर्व जबाबदारी पार पाडली. दोघांनी त्याच्या करिअरसाठी वाहून घेतल्यामुळे नवा इतिहास घडला. - विजयकुमार माने, संचालक, केपीएस चेस ॲकॅडमी

टॅग्स :SangliसांगलीChessबुद्धीबळ